चंदिगढ (वृत्तसंस्था) ईडी बेकायदा उत्खनन प्रकरणी कॉंग्रेसच्या २६ आमदारांवर नोटीस पाठविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे केंद्राच्या कृषी कायद्यांना केलेला विरोध पंजाबच्या काँग्रेस आमदारांना भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणइंदर यांच्या विरोधातील फाईल चार वर्षांनी पुन्हा उघडल्यानंतर ईडीने आता २६ आमदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. ईडी काँग्रेसच्या या आमदारांवर मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. ईडीने बेकायदा उत्खनन प्रकरणी या आमदारांना नोटीस पाठविण्याच्या तयारीत आहे. ईडीची कारवाई होणार असल्याचे समजताच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून आमदारांपर्यंत मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईसाठी ईडीला केंद्राची परवानगी मिळाली आहे. यामुळे ईडीच्या दिल्लीतील बड्या अधिकाऱ्यांनी जालंधरमध्ये तळ ठोकला असून ईडीच्या ऑफिसमध्ये फाईल्स तपासण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
















