मुंबई (वृत्तसंस्था) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज मुंबईत अनेक ठिकाणी धाडी (Enforcement Directorate searches) टाकल्या. दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim), इकबाल कासकर आणि हसीना पारकर यांच्याशी संबंधीत काही मालमत्तांवर ही कारवाई सुरू असल्याचं समजतंय. मुंबईतीई मोठे नेते देखील ईडीच्या रडारवर असल्याचं समजतंय.
संपत्ती कराराबाबत ईडीने धाडी टाकल्या आहेत. अंडरवर्ल्डचा या करारामध्ये पैसा असल्याच्या संशयावरून ही कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. ईडी आणि एनआयएला ठोस पुरावे मिळाल्यानं या धाडी टाकल्या जात आहेत. यामध्ये मोठ्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचंही समोर येत आहे. फक्त महाराष्ट्र आणि मुंबईच नाही तर दिल्लीतून देखील तपास पथकं मुंबई आल्याचं समजतंय. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेपूर्वी ED ची ही कारवाई होत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.