TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंबंधी प्रकरणांमध्ये ED ची मुंबईत छापेमारी ; एका मंत्र्याचीही चौकशी !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 15, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अंमलबजावणी संचलनालया (ED) ने मुंबई आणि परिसरात अंडरवर्ल्ड गॅंगस्टर दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेच्या प्रकरणाशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. या प्रकरणाशी संबंधितच ईडी आणि एनआयएचे ही छापेमारी असल्याचे कळते. सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एक मंत्रीही या प्रकरणात सहभागी असल्याची ईडीला शंका आहे. हवाला प्रकरणी या मंत्र्यांची ईडीकडून चौकशीही करण्यात आली आहे.

१९८० च्या दशकामध्ये भारतसोडून पळ काढणाऱ्या दाऊद इब्राहिम परदेशात बसून देशामध्ये मोठे आर्थिक व्यवहार करतो असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. मुंबईमधील डी कंपनीचा संबंध पंजाबपर्यंत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. या पंजाब कनेक्शनमुळे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून अंडरवर्ल्डचा वापर पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. या महिन्याच्या सुरुवातीलाच तपास यंत्रणांनी अबू बकारला अटक केलीय. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असणारा अबू तब्बल २९ वर्षानंतर यंत्रणांच्या हाती लागला असून तो दाऊदचा जवळचा सहकारी आहे. अबूला संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईमधून अटक करण्यात आलीय.

READ ALSO

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीनं ऑपरेशन सुरु केलं

ईडीचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांवरुन केंद्र आणि राज्यातला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अशातच मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं मोठी कारवाई सुरु केली आहे. काही नेत्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात केलेल्या कराराशी निगडीत हे छापासत्र असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीनं हे ऑपरेशन सुरु केलं असल्याचं माहिती. त्यात एनआयए देखील ईडीला या कारवाईसाठी मदत करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व प्रकरणात दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकरचा ताबा घेऊन ईडी आणखी चौकशी करणार असल्याचंही कळतंय.

छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येणार

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं छापेमारी सुरु केली आहे. यावेळी ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत करार करणारे काही नेतेमंडळी आहेत. दाऊदची बहीण हसीना पारकर आणि भाऊ इक्बाल कासकर यांच्या मुंबईतल्या घरी ईडीचं पथक पोहोचलं आहे. त्याठिकाणी अतिरिक्त फौजफाटा देखील मागवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीनं हे ऑपरेशन सुरु केल्याची माहिती मिळत आहे. एनआयए अर्थात, राष्ट्रीय तपास यंत्रणेला १५ दिवसांपूर्वी दाऊद संदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले होते. त्या अनुषंगानं तपास करणाऱ्या ईडीच्या पथकानं आज मोर्चा दक्षिण मुंबईकडे वळवला. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

असा सुरु झाला मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील गँग वॉर

मुंबई पोलीस खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा असणारा दाऊद इब्राहिमने डोंगरीमधून आपल्या गुन्हेगारी क्षेत्रातील हलचालींना सुरुवात केली. डोंगरीमध्ये त्याची ओळख हाजी मस्तानच्या गँगशी झाली आणि तिथूनच मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील गँग वॉरचा कालावधी सुरु झाला. १९८० दरम्यान दाऊदला एका चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेली. नंतर त्याच्यावरील गुन्ह्यांची संख्या वाढतच गेली. हाजी मस्तान आणि पठाण गँगदरम्यानच्या वादामुळे दिवसोंदिवस दाऊद अधिक धोकादायक झाला. पठाण गँगमध्ये प्रामुख्याने अफगाणिस्तानमधून आलेल्या लोकांचा समावेश होता. नंतर याच गँगवॉरमधून आणि वादामधून मुंबईवर आपली दहशत निर्माण व्हावी या हेतूने दाऊदने मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
Next Post

चाळीसगावात दोन चोरट्यांनी धूम स्टाईल लांबवली वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : गिरीश महाजन, रामेश्वर नाईक विरोधात कठोर कारवाई करु नये : मुंबई उच्च न्यायालय

December 18, 2020

पाळधी येथील ‘त्या’ अवैध मुरूम साठ्याची तक्रारदाराविना फेरचौकशी !

February 16, 2023

शिक्षकांसाठी ‘नवदिशा’ पोर्टलचा शुभारंभ

September 9, 2020

बकालेंच्या अटकेसाठी मराठा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा !

September 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group