पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील एका सहकारी बँकेवर अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी सकाळी बॅंकेच्या मुख्यालयावर छापा टाकला. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. तब्बल ७१ हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणात NCP चे आमदार अनिल भोसले यांना अटक करण्यात आली आहे. या बँकेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर ED ने छापेमारी केली आहे. काल सकाळच्या वेळेत अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी बँकेवर धाड टाकली. यावेळी अनिल भोसले व रेश्मा भोसले यांच्यासह १४ संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल ७१ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यावेळी काही महत्वाची कागदपत्रंही ईडी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. बँकेसोबतच अनिल भोसले यांच्या शिवाजीनगरमधील कार्यालयावरही ईडीने छापे टाकले आहे. सकाळपासून तिथंही झाडाझडती सुरू आहे. बँक घोटाळ्याची व्याप्ती ३५० ते ४०० कोटींच्या पुढे गेल्यानं पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं ईडीला कळवलं होतं. त्यानुसार ईडीने आमदार अनिल भोसले यांच्या ऑफिसवर छापा टाकला. आमदार अनिल भोसले सध्या तुरूंगात आहेत. भोसले हे राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे अनेक नेते चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला एक महिलेसोबत असलेल्या संबंधातून दोन मुलं असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या मागे ईडीचं चक्र मागे लागल्यानेही हेदेखील चर्चेत होते. आता तर तब्बल ७१ हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणात NCP चे आमदार अनिल भोसले यांना अटक करण्यात आली आहे.
मालमत्तेची किंमत ३२ कोटी
भोसले यांच्याकडे कोरेगाव मूळ येथे स्वतःची शेती, तसेच शिवाजीनगर, विश्रांतवाडी, कोथरूड, वारजे यासह शहराच्या वेगवेगळ्या भागात दुकाने, व्यावसायिक संकुल, दुकाने, सदनिका, मिळकती अशा १८ हून अधिक मालमत्ता आहेत. त्याचबरोबर त्यांची १७० बॅंक खाती असून त्यामध्ये एक कोटी ९० लाख रुपयांची रोकड आहे. संपूर्ण मालमत्तेची किंमत ३२ कोटी रुपये इतकी असून ही मालमत्ता अधिगृहित करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे.