TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चार जणांची निर्घृण हत्या, एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा !

बहिणीनेच सख्या भावांची आणि भाच्यांची केली होती हत्या !

vijay waghmare by vijay waghmare
May 18, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (वृत्तसंस्था) शेतजमिनीच्या वाटपातून करण्यात आलेल्या चौघांच्या नृशंस हत्येप्रकरणी शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील चौथा आरोपी घटनेच्या वेळी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर बालगुन्हेगार न्यायालयात खटला सुरू आहे. अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील ग्राम मालपुरा गावात शेतीच्या जमिनीवरून हे हत्याकांड घडले होते.

अकोट न्यायालयाने फाशीची शिक्षा देण्याची ही पहिलीच घटना आहे. हरिभाऊ राजाराम तेलगोटे (५५), द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे (५०) आणि श्याम ऊर्फ कुंदन हरिभाऊ तेलगोटे (२४) अशी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या दोषींची नावे असून, ते सर्व अकोटमधील राहुलनगरचे रहिवासी आहेत. शेतीच्या हिश्श्याच्या वाटणीतून झालेल्या वादातून या सर्वांनी मिळून धनराज सुखदेव च-हाटे, शुभम धनराज च-हाटे , गौरव धनराज च-हाटे आणि बाबुराव सुखदेव च-हाटे यांची गळा चिरून व पोटावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. धनराज च-हाटे हे पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. ही घटना २८ जून २०१५ रोजी घडली होती.

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

च-हाटे कुटुंबाची अकोटच्या मालपुरा गावी शेती होती. त्यात धनराज आणि बाबुराव यांची बहीण द्वारकाबाई हिस्सा मागत होती. त्यावरून तेल्हारा येथील दिवाणी न्यायालयात प्रकरण प्रलंबित होते. या घटनेच्या एक महिन्यापूर्वी द्वारकाबाईने भावांच्या शेताच्या मध्यभागी दोन एकर क्षेत्रफळावर कपाशीची लागवड केली होती. त्यानंतर तिच्या भावांनी तेथेच दुसऱ्या पिकाची लागवड केली. त्यावरून वाद चिघळला होता. २८ जून २०१५ रोजी द्वारकाबाई दुपारी तीनच्या सुमारास त्या शेतात सरकीची लागवड करीत होती. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर द्वारकाबाईने तिचा मुलगा श्याम याला फोन करून मालपुरा येथे बोलावले. श्याम, त्याचा अल्पवयीन भाऊ आणि वडील हरिभाऊ हे तेथे पोहोचले. त्यांनी च-हाटे कुटुंबाशी वाद घातला आणि द्वारकाबाईचे दोन भाऊ आणि भाचे यांच्यावर विळा, चाकू, कुऱ्हाडीने हल्ला चढवला. त्यात ते चौघे जागीच ठार झाले.

या प्रकरणातील आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना भारतीय दंडविधानाच्या कलम ३०२, ५०६ सहकलम ३४ नुसार शिक्षा ठोठावण्यात आली. द्वारकाबाई, तिचा पती आणि मोठा मुलगा यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सोबतच प्रत्येकी रुपये ५० हजार दंडही करण्यात आला आहे. दंड न भरल्यास आरोपींना ५ वर्षांच्या अधिकच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. चौथा आरोपी घटनेच्या वेळी अल्पवयीन असल्याने बालगुन्हेगार न्यायालयात खटला सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Akolamuder

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिझ खानला फाशीची शिक्षा

March 16, 2021

‘आठवणींचे मोरपीस’ माजी विद्यार्थ्यांनी गुरुंच्या आशिर्वादाने केला बालदिवस साजरा

November 16, 2021

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026

एका दिवसात ८२ हजार १७० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद !

September 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group