TheClearNews.Com
Saturday, February 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दोन दिवसापूर्वी मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी करणार असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

गुरुवारी दुपारी मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील तापी नदीकाठच्या गावांमध्ये वादळी पावसाने केळी पिकांबरोबरच इतर पिकांचे, घरांचे तसेच विद्युत पोल व तारांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून माहिती संकलित करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी स्वतः राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी करणार असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे भरपाई त्यांना मिळवून दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढला असेल त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत त्याचबरोबर विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अधिकाधिक मदत देण्यासाठी प्रयत्नशील राहील असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

READ ALSO

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

तालुक्यातील अंतुर्ली ते उचंदे परिसरातील ३१ गावांना वादळी पाऊस व वाऱ्याने दिलेल्या जोरदार तडाख्यात मोठ्या प्रमाणात केळीचे व घरांचे नुकसान झाले असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे उचंदा, मेंढोदे, नायगाव तर रावेर तालुक्यातील निंभोरासीम, विटवा, निंबोल, ऐनपूर, वाघाडी, धामोडी, सुलवाडी व इतर ठीकाणी झालेल्या वादळी वार्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना धीर दिला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, डॉ.जगदीश पाटील, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन शुभांगी भारदे, तहसीलदार श्वेता संचेती, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी संतोष नागटिळक, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, भामरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता महेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देत विमा कंपन्यांना देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच मेंढोदे गावातील १८० घरांचे नुकसान झाल्याने गावकर्यां ना मोफत अन्नधान्य तत्काळ देण्याच्या सुचनाहि प्रांताधिकारी यांना पालकमंत्र्यांनी दिल्या.

मेंढोदे गावाचे पुनर्वसना संदर्भात पुनर्वसन मंत्र्यांची आमदार श्री.पाटील व गावातील सरपंच यांचेसह येत्या पंधरा दिवसात बैठक घेण्यात येईल तसेच कब्जेसाठी आकारणी कमी करण्यासाठी पुनर्वसनमंत्री यांचेकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. पिक विमा भरलेले शेतकरी व पीक विमा न भरलेले शेतकरी असे वर्गीकरण करून सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी देता येईल या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच राज्य शासनातर्फे देखील यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जास्तीत जास्त मिळण्यासाठी प्रयत्न करेल असेही पालकमंत्री श्री.पाटील यांनी सांगितले. तसेच वादळी वार्यामुळे विद्युत पोल व तारांची मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे त्याची त्वरित दुरुस्त करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
जळगाव

महापौर आणि नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव?, भाजप नगरसेवकांच्या ठिय्या आंदोलनाने उठले अनेक प्रश्न

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

February 26, 2026
चाळीसगाव

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

February 26, 2026
Next Post

धाडी नदी पात्रात खड्डा खोलीकरणास सुरुवात : शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरण : खडसे परिवारातील सदस्यांच्या मालमत्तेवर बोजे !

February 2, 2024

बुलढाणा अपघात : पालकमंत्री गुलाबराव पाटील घटनास्थळी दाखल ; मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन, जखमींची विचारपूस !

July 1, 2023

बिहारच्या बालनिरीक्षणगृहात पुन्हा लैंगिक अत्याचार उघड !

August 13, 2021

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

October 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group