धरणगाव (प्रतिनिधी) चोपडा रोडवरील पवार पेट्रोल पंपाजवळ आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दोन जखमी झाले. ही घटना गुरुवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास घडली.
साळवा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन लोटन अत्तरदे (वय ५८) भाऊ, मुलगा, मुलगी हे नागपूरहून रेल्वेने धरणगाव रेल्वेस्थानकावर आले. त्यांना घेण्यासाठी मोरेश्वर अत्तरदे हे धरणगावला आले होते. लटान मलांना सोबत घेऊन दुचाकीने साळव्याकडे जात असताना चोपडा रस्त्यावरील पवार पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याचे पाहून आयशर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी मोरेश्वर अत्तरदे यांना उपचारासाठी जळगाव नेर असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. तर जखमी मुलगा व मुलगी या दोघांना नागरिकांनी दवाखान्यात दाखल केले त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते. मयत मोरेश्वर अत्तरदे हे अविवाहित होते. पश्चात वडील, भाऊ, असा परिवार आहे.















