जळगाव (प्रतिनिधी) येथील बोहरा बाजारातील हार्डवेअर दुकानाच्या ओटावरून कापडी पिशवीतील आठ हजार रुपयांची रोकड अज्ञात व्यक्तीने लांबविल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, अबुजुझर अब्बासभाई बदामी (वय-५७ रा. पंचमुखी हनुमान मंदीरामागे, रणछोडदास जळगाव) हे कामाच्या निमित्ताने अकबरअली शेख अब्दुल हुसैन हार्डवेअर दुकानावर सोमवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गेले. त्यावेळी ते दुकानाच्या ओट्यावर बसले होते. अज्ञात चोरट्याने जुझार यांच्या ताब्यातील ८ हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक विजय निकम करीत आहे.