मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर आता पक्षाने आमदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली आहे. काल शिवसेनेने एकनाथ शिंदे यांचं गटनेतेपद काढून घेतलं, यानंतर आता शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांना नोटीस पाठवली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेनेची बैठक बोलावण्यात आली आहे, या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत. या बैठकीला हजर न राहिल्यास स्वेच्छेने शिवसेना पक्षाचे सदस्यत्व सोडणार असल्याचे समजून आपल्यावर भारतीय संविधान सदस्याच्या अपात्र संदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करणार असल्याचा इशारा या दोघांना देण्यात आला आहे.