अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद शिवारातील शेतातील पीव्हीसी पाईपांची तोडफोड करून नुकसान करून वृध्द महिलेला अश्लिल शिवीगाळ करत मारहाण करून धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अनिता जगन्नाथ पाटील (वय ६६ रा. दहीवद ता. अमळनेर), हे वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांनी दहीवद शिवारातील शेत गट क्रमांक ९१४ मधील शेत तारण केलेले आहे. त्यांच्या शेताच्या बाजूला शेत असलेले संभाजी नथ्थू पाटील आणि आशाबाई संभाजी पाटील दोन्ही रा.दहीवद यांनी अनिता पाटील यांच्या शेतातील ७ पीव्हीसी पाईप यांची तोडफोडून करून नुकसान केले. २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अनिता पाटील या महिला शेतात गेल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी मुलाला फोन करून हा प्रकार सांगितला. त्याचवेळी संभाजी पाटील आणि आशाबाई पाटील हे दोघेजण अनिता पाटील यांच्याकडून येवून आम्हीच पाईपाची तोडफोड केली असे सांगून अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी शनिवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दाम्पत्यावर गुल्हा दाखल केला आहे.