जळगाव (प्रतिनिधी) लोकांमधून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडून घेणे हे चुकीचे आहे. हा निर्णय काही योग्य नाही. भाजपमध्ये असतानाच आम्ही या अडचणीला सामोरं गेलो होतो, असा अनुभव राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितला. ते जळगावात बोलत होते.
एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, हा निर्णय काही योग्य नाही. मी अनुभवलेला आहे. लोकांमधून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडून घेणे हे चुकीचे आहे. याआधीही मी भाजपमध्ये असताना नगराध्यक्ष निवडणुकीत आमचा उमेदवार निवडून आणला होता. अगदी 2020 साली जळगाव महापालिकेमध्ये भाजपचा लोकनियुक्त सरपंच आम्ही निवडून आणला होता. त्यावेळी पाच वर्ष हा काय काळ होता तो विचित्र गेला होता. त्यावेळी इतर सदस्य हे वेगळा निर्णय घ्यायचे आणि नगराध्यक्ष हा वेगळा निर्णय घ्यायचा. नगराध्यक्ष वेगळा निर्णय घ्यायचा तर त्याला सदस्य विरोध करायचे, असं खडसेंनी साांगितलं. सरपंच निवडणूकही अशी झाली तर सदस्य आणि त्यांच्यात वाद निर्माण होतो. सरपंच हा काहीच कामाचा नसतो. त्याला कोणतेही अधिकारी राहत नाही. त्यामुळे हा निर्णय घेणे चुकीचे आहे. एकतर नगराध्यक्षाला आणि सरपंचाला अधिकार दिले पाहिजे. काही विशेष अधिकार असले तरच तो काम करू शकतो. पण अधिकारच नसले तर बहुमतावरच त्याला अवलंबवून राहावे लागते, यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण होते. यापेक्षा पूर्वीची जी पद्धत होती, ती योग्य होती, असंही खडसेंनी सांगितलं. मुक्ताईनगरमध्ये आमच्या पक्षाचा नगराध्यक्ष होता, तोपर्यंत सगळं काही ठीक होतं. पण पक्ष बदलला आणि काही लोक दुसऱ्या पक्षात गेले. त्यामुळे आमची काही लोक आणि विरोधक अशी भूमिका झाली. त्यामुळे प्रशासनात निर्णय घेण्यास अडचणी निर्माण झाल्यात, असंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं.