धरणगाव (प्रतिनिधी) येथील पालिकेच्या विविध समितीच्या सभापतींची निवड आज जाहीर करण्यात आली.
येथील पालिकेच्या विविध समितीच्या सभापतींची निवड आज जाहीर करण्यात आली. त्यात पाणीपुरवठा (पदसिध्द) उपनगराध्यक्षा कल्पना विलास महाजन, सार्वजनिक आरोग्य विनय(पप्पू)भावे, शिक्षण सभापती वासुदेव चौधरी, नियोजन अहमद पठाण, महिला व बालकल्याण सभापती:अंजली विसावे, महिला बालकल्याण उपसभापती किर्ती मराठे तर बांधकाम सभापतीपदी सुरेखा महाजन यांची निवड जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित सर्व सभापतींचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.