मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना प्रमख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी ओपन प्रचार केला, त्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप दोघेही होते, आम्ही जिंकलो. सगळ्यांना झटका बसला, याची आठवण करुन दिली. त्याचवेळी आता पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक व्हायला पाहिजे, असे शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. मात्र, शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर घुमजाव केले आहे. मी कुणावर टिका केलेली नाही असे सांगत विलेपार्लेत विधानसभेत निवडणूक झाली. मतदार संभ्रमात आहे. आपण दिलेलं मत नेमकं त्याच पक्षाला अर्थात उमेदवाराला जात आहे का, याबद्दल भीती आणि संशय आहे. हा संशय दूर व्हायला पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक व्हायला पाहिजे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी यावेळी केली. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे गोव्यात प्रचाराला येणार आहेत. कोविड नियमांचं पालन करुन गोव्यात प्रचार करणार आहेत, अशी माहिती यावेळी राऊत यांनी दिली.
हिंदूत्व वाढेल, निवडणूक या मुद्दांवर जिंकू शकतो. आम्ही एकत्र निवडणुक लढू शकतो, असा प्रस्ताव आला. प्रमोद महाजन होते, अटल बिहारी वाजपेयी होते. नवहिंदूत्ववादी जे भाजपचे नेते आहेत, त्यांना सध्या माहिती नाही, असा चिमटा भाजपच्या नव्या नेत्यांना संजय राऊत यांनी काढला.