धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शामखेडा येथील एका घराच्या ओट्यावरून चक्क इलेक्ट्रिक मोटार चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात योगेश पांडुरंग सातपुते (वय ४७, रा. शामखेडे ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३३०० रुपये किमतीची पाणी भरण्याची SHARP ०.५ HP V TYPE पिवळ्या रंगाची ईलेक्टिक मोटार कोणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने योगेश यांच्या घराच्या ओट्यावरुन चोरुन नेली. धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास संतोष थोरात हे करीत आहेत