जळगाव (प्रतिनिधी) शासनाचे इलेक्ट्रिकल कामे करणाऱ्या कंत्राटदाराकडन परवाना नूतनीकरणासाठी १५ हजारांची लाच स्वीकारतांना खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे विद्युत निरीक्षकाला लाचलूचत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. गणेश मांगो सुरळकर (वय ५२, रा. पार्वती नगर), असे संशयित आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार तरुण हा कंत्राटदार असून तो शासनाचे इलेक्ट्रिकचे कामे घेत असून त्यांच्याकडे परवाना देखील आहे. त्यांचे लायसन नुतनीकरणासाठी त्यांनी खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे विद्युत निरीक्षक गणेश मांगो सुरळकर यांच्याकडे अर्ज केला होता. लायसन नूतनीकरणासाठी अधिकाऱ्याने त्यांच्याकडे १५ हजारांची लाच मागितली होती. दरम्यान, तक्रारदाराने याबाबतची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी गणेश सुरळकर यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एन. एन. वाघ, सफौ दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, दीपक पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, रविंद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळू मराठे, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.
















