चोपडा (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव , आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविदयालय, चोपडा. मानसशास्त्र विभाग व मानसमित्र समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पौगंडावस्थेतील शिक्षण या विषयावर विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, मानसशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतिष सुर्ये, दुसरे प्रमुख मार्गदर्शक साईबाबा मल्टीस्पेशालिटी आणि क्रिटीकल केअर सेंटर चोपडा येथील डॉ. योगिता कदम (काटे), मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. आर. पाटील, उपप्राचार्य तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रो. डॉ. आर. एम. बागूल, उपप्राचार्य डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, समन्वयक श्री. पी. एस. पाडवी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
तसेच सदर कार्यशाळेचे आयोजन दोन सत्रांमध्ये केले होते. यावेळी मुलांच्या पहिल्या सत्रात उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक डॉ. सतिष सुर्ये यांनी “पौगंडावस्थेत होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक बदल’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, पौगंडावस्था हा लैंगिक संक्रमणाचा काळ असून या काळात शरीरात लैंगिक बदल होतात. पौगंडावस्थेतील शारीरिक बदलांमुळे मुलींची स्रीत्वाकडे तर मुलांची पुरुषत्वाकडे वाटचाल सुरु होऊन ती प्रजननक्षम होतात. तसेच या काळात मुला-मुलींमध्ये शारीरिक व मानसिक समस्या दिसून येतात. मुलाच्या शंकांचे देखील यावेळी समाधान करण्यात आले.’
यानंतर मुलींच्या स्वतंत्र दुसऱ्या सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. योगिता कदम (काटे) यांनी मुलींना पौगंडावस्थेतील होणाऱ्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच रासायनिक बदल व असमतोल याबद्दल सविस्तर माहिती दिली. मुलींनी आपल्या जीवनशैलीत काय बदल केले पाहिजेत तसेच मैदा, बिस्कीट तसेच तेलातील तळलेल्या इतर स्नैक्स सारख्या वस्तू पूर्णपणे टाळून आपल्या आहारात बदल करून आपल्या पुढील येणाऱ्या शारीरिक आरोग्याविषयी अडचणी टाळण्यास कशी मदत होईल याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर.आर. पाटील यांनी तर सूत्रसंचालन व आभार श्री. संदीप बी. देवरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. माया शिंदे, डॉ. क्रांती क्षीरसागर, प्रा. डॉ. एम. एल. भुसारे, प्रा. डॉ. डी. डी. कर्दपवार, डॉ. मुकेश पाटील, प्रा. वाय. एन. पाटील, डॉ. अभिजित साळुंखे, डी. पी. सोनवणे, चेतन बाविस्कर, अश्विनी जाधव, मोतीराम पावरा, गौरी पवार, वैशाली पाटील, नरेंद्र सोनवणे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.