चाळीसगाव (प्रतिनिधी) अनेक दिवसांपासून पत्रकार परिषद,निवेदन आणि वेगळ्या माध्यमातून सरकार व प्रशासनाला सूचना देऊन देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार न केल्यामुळे आज माजी खासदार उन्मेशदादा पाटील, माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या व महाविकास आघाडीच्या वतीने 21 तारखेला धरणे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असून आज चाळीसगाव तालुका महाविकास आघाडीच्या वतीने प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत तहसील कार्यालय दणाणून सोडला.
निवेदनातून फोडली बळीराजाच्या प्रश्नांना वाचा !
महाविकास आघाडीच्या वतीने दिलेल्या निवेदनात खालील बाबीवर सरकारने व प्रशासनाने गांभीर्याने तात्काळ निर्णय घेणे गरजेचे असल्याचं शासनाला ठणकावले आहे.
1) कापूस भावांतर योजना शेतमालाच्या भावाच्यासाठी गेल्या दोन वर्षापासून शेतकरी होरपळतो आहे.कापसाचा आणि सोयाबीनच्या कमी भावाने विक्री होते परिणाम स्वरूप भावांतर योजनेतून त्याला मदत करण्याची घोषणा पाचोरा व भुसावळ येथे देवेंद्र फडणवीस यांनी केली. परंतु त्याचे निकष, त्याचं धोरण अद्याप पावेतो ठरले नाही. कुठले अटी शर्ती न लावता सरसकट त्याला मदत ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी शेतकरी बांधवांना अंगठ्यावर ज्याप्रमाणे कर्जमाफी दिली त्या पद्धतीने देण्यात यावी.
2) दूध उत्पादकांना पाच रुपये जो अनुदान फरकरुपी देण्यात येणार होता.त्याचे अद्याप पावतो कार्यवाही झाली नाही आणि परिणाम स्वरूप दुध उत्पादक शेतकरी अत्यंत नुकसान आणि वैफल्यग्रस्त आहेत. त्या दृष्टिकोनातून तात्काळ विहित कालावधीमध्ये अनुदान मिळण्यासाठीचा परवानगी आणि प्रस्ताव सादर करून त्याला अनुदान देणे.
3) दुष्काळाचा अनुदान जे 137 कोटी पैकी 70% पेक्षा जास्त अनुदान अद्याप पावेतो शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही. ई केवायसीच्या नावाखाली त्याला फिरविण्यात येते आहे.तात्काळ सात दिवसाच्या आत अनुदान दिले जावे.
4) दुष्काळाच्या अनुषंगाने मनरेगातून मागेल त्याला विहिर मागेल त्याला शेततळे अस्तरीकरणसह , मागेल त्याला फळबाग आणि गाय गोठा या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करून मान्यता घेत प्रस्ताव मंजूर करून त्या संदर्भात गावपातळीवर अभियान राबवावे.
5) शेतकरी बांधवांना शेती करत असताना लोडशेडींगला सामोरे जावे लागत आहे. सब स्टेशनवर सोलर वर टाकण्यासंदर्भात घोषणा केल्या जात आहेत किंबहुना जागा संपादन केली असं सांगितलं जातं आहे.माञ अद्याप पावेतो अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.विहित कालावधीत ती करण्यात यावी.लोड शेडिंग बंद करून दिवसा त्याला लाईट देऊन शहरातल्या लोकांना देखील लोडशेडींग मुक्त करत असताना स्मार्ट मीटर हे चाळीसगाव तालुक्यात बसवले जाणार नाही.याची हमी विद्युत विभागाकडून देण्यात यावी.
6) भरड धान्य शासनातर्फे खरेदीची मुदत वाढ २० जून पर्यंत मिळालेली आहे.परंतु , सातबारावर नोंद ऑनलाईन होत नाही ग्रामीण भागात अडचणी येतात ऑनलाईन उताऱ्याची अट रद्द करून ती नोंद ऑफलाईन तलाठ्याच्या सही शिक्क्याने दिलेल्या उताऱ्यानुसार खरेदी करण्यात यावी, त्याचप्रमाणे शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ज्वारी खरेदी करण्यासंदर्भात 135 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र 800 क्विंटल ज्वारी खरेदी करून खरेदी बंद करण्यात आली. या शेतकऱ्यांची सुमारे 4000 क्विंटलपेक्षा अधिक ज्वारी मोजणीच्या प्रतीक्षेत असून शासनाने यासंदर्भात मोजणी करण्याचे आदेश द्यावेत, अशा सहा बळीराजाच्या जीवनाशी निगडीत महत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देवून आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आली होती आहे.
यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्रबापू पाटील, तालुकाप्रमुख रमेशआबा चव्हाण,तालुका संघटक सुनील गायकवाड, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिनेश भाऊ पाटील, शेतकरी गटाचे भैयासाहेब पाटील, नगरसेवक सदाशिव आप्पा गवळी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल बापू निकम, जिल्हा सरचिटणीस देवेंद्रसिंग पाटील, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष एड. राहुल जाधव, हनुमंत जाधवसर ,दादाभाऊ पाटील, मुकेश गोसावी, अल्पसंख्याक आघाडीचे जावेदभाई शेख,महेंद्रभाऊ जयस्वाल, उमेश आंधोलकर, दत्तू गवळी, दीपक देशमुख, सुभाष शिंदे, श्रावण पाखरे, सचिन फुलवारी, सागर पाटील, अनिल चव्हाण, प्रेमदास पाटील, युवा सेना शहराध्यक्ष रॉकी धामणे, रावसाहेब महाले, ललित बिडे यांच्यासह कार्यकर्ते मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.