भुसावळ (प्रतिनिधी) दीपनगरातील न्यू ई टाईप बिल्डींगमध्ये कर्मचार्याला अज्ञाताने दगडाने मारहाण केल्याची घटना सोमवार, 7 ऑग्स्ट रोजी रात्री अडीच वाजता घडली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश तळेले (39, तळेले, ता.भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, दीपनगर वसाहत परीसरात सोमवारी रात्री अडीच वाजता 23 ते 25 वयोगटातील अनोळखीला हटकल्याने त्यास त्याचा राग आला व त्याने संतापाच्या भरात रस्त्यातील दगड तक्रारदाराच्या डोक्याला मारून दुखापत करीत पळ काढला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय शामकुमार मोरे करीत आहेत.