बोदवड (प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायत आवारात कर्मचाऱ्यांनी महत्त्वाचे दस्ताऐवज जाळल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे गटनेते जफर शेख यांनी केला आहे. दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
बोदवड नगरपंचायतमध्ये शनिवारी दुपारी 3 वाजेपासून नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून काही दस्तऐवज जाळली जात होती. यावेळी नगरपंचायत कार्यालय समोर साखळी उपोषणाला राष्ट्रवादी विरोधी पक्ष गटनेते जफर शेख बसलेले असता त्यांना धुराचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांनी सदर धुर बंद करा?, असे म्हटले पण तरीही धुर बंद न झाल्याने सदर जळत असलेल्या जागेजवळ गेल्यास त्या ठिकाणी कर्मचारी नगरपंचायत दस्तऐवज जाळत असल्याचे दिसून आले. शेख यांनी त्यातील काही दस्तऐवज जळत्या आगीतून काढले आणि नगरपंचायत आवारात काही महत्त्वाचे दस्तऐवज जाळले गेले, असा आरोप केला.
या प्रकरणी जफर शेख यांनी मुख्याधिकारी गजानन तायडे यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. पण कार्यालयात हजर असताना सुध्दा त्यांनी आज सुट्टी असल्याने निवेदन सोमवारी द्या, सांगितले. या दस्तऐवजमध्ये जुने ग्रामपंचायत कालीन रोजगार हमी जाँब, काही जन्म मुत्यू दाखल्याचे नमुने यासह काही दस्तऐवज यात जाळली गेली, असा आरोप विरोधी गटनेते जफर शेख आणि नगरसेवक मुजमिल शहा यांनी केला आहे. तसेच निवेदन स्विकारले नसल्याने सोमवारी निवेदन देण्यात येणार, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी गजानन तायडे यांना विचारले असता जिर्ण तसेच महत्त्वाचे नसलेले कागद पत्र कर्मचारी यांना वेगळे करण्यासाठी सागितले होते, ज्यामुळे कपाटामध्ये महत्त्वाचे दस्तऐवज ठेवण्यास जागा होईल आणि जाळण्यात आलेले अभिलेख हे महत्त्वाचे नसल्याने जाळण्यास सागितले होते, असे मुख्याधिकारी तायडे यांनी सांगितले.