चिपळूण (वृत्तसंस्था) नगर परिषद अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी बाजारपेठेत खोकेधारकांविरुद्ध धडक कारवाई केली. मात्र, ही कारवाई रोखण्यासाठी माजी नगरसेवक रमेश खळे या दोघांनी इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
या कारवाई ला सुरुवात करताच माजी नगरसेवक खळे हे टपरीच्या शेडवर चढले, तर त्यांचा मुलगा साहिल खडस शॉपिंग मॉल वर चढला आणि कारवाई झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला. खळे ज्या ठिकाणी उभे होते. तेथून मुख्य विद्युत लाईन गेल्याने त्या लाईनला पकडून आत्महत्या कारेन, असा इशारा दिला. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली. तसेच पोलिसांची मोठी तुकडी देखील दाखल झाली होती. अखेर पोलिसांनी साहिल खळे याला इमारतीवरून खाली उतरवले व ताब्यात घेतले. त्यानंतर भोगाळे, मध्यवर्ती बस स्थानक व उर्वरित भागात नगर परिषदेची कारवाई सुरूच होती.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे नगर परिषदेने बाजारपेठेतील अनधिकृत खोकेधारक व हातगाडी धारकांना विरोधातील मोहीम थांबली होती. मात्र काहींनी त्याचा फायदा उठवत मोठी दुकाने मांडली होती. काहींनी तर कायमस्वरूपी बांधकामे केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगर परिषदेने ही कारवाई सुरू केली