नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत विरुद्ध इंग्लंड संघात आज पासून ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात टीम इंडिया पाच गोलंदाजांसह मैदानावर उतरली आहे.
या सामन्यातून भारतीय संघात नियमित कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय भारतीय संघात इशांत शर्माचेही पुनरागमन झाले आहे. तसेच पहिल्या कसोटीसाठी अंतिम ११ जणांच्या संघात रिषभ पंतला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी मिळाली आहे. तर शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर हे अंतिम ११ जणांच्या संघात कायम आहेत. याबरोबरच शहाबाज नदीमलाही भारताच्या ११ जणांच्या संघात संधी मिळाली आहे. तसेच भारत-इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच भारतीय संघाला धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियात सुरु झालेली दुखापतीची मालिका मायदेशातही सुरु आहे. बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार अष्टपैलू अक्षर पटेल याला दुखापत झाल्यामुले पहिल्या कसोटीला मुकणार आहे. अक्षर पटेलऐवजी संघात शाबाज नदीम आणि राहुल चहर या दोन फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. पदार्पणाची संधी मिळण्याआधीच अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा दुखापतग्रस्त खेळाडूंची चर्चा सुरु झाली आहे.
भारतीय संघ चेन्नईत तीन फिरकी गोलंदाजांसह खेळणार असून, रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांच्या साथीला अक्षर पटेलला पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र आता वॉशिंगटन सुंदरचं संघातील स्थान जवळपास निश्चित मानलं जात आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्यात अष्टपैलू चमक दाखवणारा वॉशिंग्टन सुंदर हा रवींद्र जडेजाच्या जागेसाठी कडवा दावेदार होता.
भारतीय संघ
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, शाहबाज नदीम
इंग्लंडचा संघ
रॉरी बर्न्स, डोमिनिक सिबली, डॅनियल लॉरेन्स, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर (यष्टीरक्षक), डोमिनिक बेस, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, जेम्स अँडरसन