पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) मध्यरात्री घरात जबरदस्ती शिरून एका विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव पोलिसांनी संशयित आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले आहे.
याबाबत पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १० रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास पीडिता ही नातेवाईक महिलेच्या घरात झोपलेली असतांना संशयित आरोपी राकेश दुर्गा बारेला (वय २१, रा. मेलाणे ता. चोपडा, ह.मु.बांभोरी प्र.चा.) हा घरात अनाधिकृतपणे घरात घुसून पिडीत महिलेच्या नातेवाईक महिलेच्या अंगावरील साडी ओढत होता. त्यावर पीडिता राकेशला बोलण्यास गेली असता त्याने पिडीतेचे दोन्ही हात पकडून तिच्या सोबत अंगलट करुन मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत विनयभंग केला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन हे करीत असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.