जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मेहरुण येथील गणेशपूरी भागात ‘जळगाव अमन कमिटी’ची स्थापना करण्यासंदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली.
या बैठकीला शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. ही बैठक मुक्तदिर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विचार विनिमय करण्यात येऊन अमन कमिटी स्थापन करण्यामागची भूमिका विशद करण्यात आली. यात आपल्या जिल्ह्यात तसेच समाजात शांतता, जातीय सलोखा,एकता, सदभावना व बंधुभाव कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यात रागिब अहमद व फहीम पटेल यांची सर्वानुमते समन्वयकपदी निवड करण्यात आली. तसेच यावेळी रईस बागवान, मुक्तदिर देशमुख, रागिब अहमद,फहीम पटेल, अशफाक पिंजारी, इद्रीस मन्यार, दानिश शेख, फरहान खान पठान,अल्ताफ शेख उपस्थित होते.