मुंबई (वृत्तसंस्था) वायुसेना विद्यालय नागपूर (Air Force School Vayusena Nagar Nagpur) येथे लवकरच फक्त शालेय शिक्षण पूर्ण असलेल्या उमेदवारांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.
या पदांसाठी भरती
चौकीदार – एकूण जागा ०३
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
चौकीदार – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान शालेय शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्तशिक्षण संस्थेच्या किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी किमान उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता
उंची – १६० सेमी असणं आवश्यक आहे. वजन- उंची आणि वयाच्या प्रमाणात असणं आवश्यक आहे. दृष्टी – ६/६ असणं आवश्यक आहे. तासाच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं आवश्यक आहे.
या उमेदवारांना मिळणार प्राधान्य
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे जर Ex-Servicemen असतील तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या उमेद्वारानं संबंधित चौकीदार या पदाचा किमान अनुभव असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसंच ज्या उमेदवाराचं घर हे वायुसेना विद्यालयाच्या जवळपास असेल अशाही उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
अशी होणार निवड
सुरुवातीला अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी घेण्यात येणार आहे. जसे की धावणे, वजन वाहून नेणे इ. गोष्टी तपासण्यात येणार आहेत. यानंतर उमेदवारांना वैद्यकीय चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. तसंच याखेरीज सक्षम प्राधिकाऱ्याला योग्य वाटलेल्या इतर कोणत्याही चाचण्या घेण्यात येऊ शकतात. अशाप्रकारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
इतका मिळणार पगार
चौकीदार – ७,५०० रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ फेब्रुवारी २०२२