धरणगाव प्रतिनिधी) महर्षी द्रोणाचार्य हे पांडव आणि कौरव यांचे गुरू परंतु वीर एकलव्य हा त्याच्या गुरुप्रति निष्ठा आणि त्यागामुळे द्रोणाचार्यांचा श्रेष्ठ शिष्य मानले जातात. जेंव्हा जेंव्हा एकलव्याचे नाव घेतले जाते तेंव्हा गुरू द्रोणाचार्य जरूर आठवतात. अन्यायाला हसत हसत सामोरा जाणारा आणि जीवनापेक्षाही भव्य अशा वीर एकलव्याचा आदर्श प्रत्येक तरुणाने घेतला पाहिजे, असे प्रतिपादन जि.प. सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी केले.
काल वीर एकलव्य जयंती टाकरखेडा ता. एरंडोल, मुसळी आणि चांदसर ता.धरणगाव येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी टाकरखेड ता. एरंडोल जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, सरपंच प्रवीण पाटील, उपसरपंच सुनील पाटील, ग्रामपंचायत सदस्य सीमा कोळी, चापाबाई वाघ, देवकाबाई जाधव, दिलीप पाटील, प्रगतशील शेतकरी गोपाळ ननावरे, निवृत्ती कोळी, वसंत पाटील, रूपा वाघ, वामन मालचे, राजू सोनवणे, सुनील वाघ, दीपक सोनवणे, भास्कर मालचे, समाधान सोनवणे, लवा वाघ, आकाश मोरे, किरण वाघ, अशोक नाईक व ग्रामस्थ चांदसर येथे सरपंच सचिन पवार व समाजबांधव, मुसळी येथे पं स माजी सभापती अनिल पाटील, सरपंच गणेश ढमाले, उपसरपंच अजम शेख मनियार, पोलिस पाटील नितीन पाटील, सुरेश गुंजाळ, वसंत भिल, बुधा सोनवणे, लहु ठाकरे, मनोहर गायकवाड, बापु मालचे, नाना मालचे, छगन ठाकरे, अजय सोनवणे, राज मोरे, भारत ठाकरे, नरेद्र सोनवणे, किशोर पवार, साजन मोरे, जय सोनवणे, शरद सोनवणे, पुडलिक पाटील, युवासेना शाखा अध्यक्ष उपस्थित होते.