जळगाव (प्रतिनिधी) सरकारचे ५ वर्षे असेच निघून जातील यांना पुन्हा येईल, पुन्हा येईल करतच रहावे लागेल. यांच्या अहंमपणामुळे भाजपची राज्यातून सत्ता गेली. हे सर्वांना माहिती आहे”, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. विरोधकांना कितीही वाटत असेल की हे सरकार पडेल, पण तसे काहीही होणार नाही. हे सरकार टिकणार आहे, व्यवस्थितपणे चालणार आहे”, असा विश्वास खडसेंनी व्यक्त केला. ते राष्ट्रवादी कार्यालयातील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ११ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी दुपारी पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना एकनाथ खडसे बोलत होते. खडसेंनी यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा यशस्वी करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकादेखील केली. यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, जेष्ठ नेते अरुणभाई गुजराथी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एकनाथराव खडसे मार्गदर्शन करतांना म्हणाले, की जयंत पाटील यांचा जळगाव दौरा असून त्यांना जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद दाखवायची आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकजूटीने, एकनिष्टेने काम करायचे आहे. राष्ट्रवादीपक्ष हा तळागळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करायचा आहे. जिल्हायातील भाजपचे अनेक जण राष्ट्रवादीत येण्यास ईच्छूक असून त्यांचा प्रवेशाबाबत नियोजन लवकरच केले जाणार असल्याचे माहिती खडसेंनी दिली.
भाजप नेत्यांवर खडसेंनी पुन्हा त्यांच्या शैलीत हल्ला चढवीत भाजप नेत्यांवर आपले कार्यकर्ते आपल्या सोडून जाऊ नये यासाठी भाजपचे सरकार पून्हा येणार, महाविकास आघाडीचे सरकार पडणार असे म्हणून वेळ काढायची आहे. परंतू महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण काळ चालणार आणि भाजप नेत्यांवर निवडणूकीच्या वेळी मी पून्हा येईल, मी पुन्हा येईल असे म्हणण्याची वेळ येणार अशी टिका करून त्यांनी अप्रत्यक्षरीत्या विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शाब्दीक टोला लगावला.
जेष्ट नेते अरुणभाई गुजराती मार्गदर्शन करतांना म्हणाले की, प्रदेशध्यश्र जयंत पाटील यांच्यासोबत ३० वर्ष काम करण्याची संधी मिळाली. राजकारणात कोणतीच गोष्ट कायम नसते, ती वेळनेनुसार बदलत असते. आज नाथाभाऊ आमच्या सोबत आहे, हे आता पाहून आनंद वाटत आहे. शरदंचद्र पवार साहेबांनी तीन वर्ष प्रदेशाध्यक्षाची संधी दिली. मंत्री महोदयांना प्रेम कार्यकर्त्यांकडून मिळत नाही तेवढे प्रेम प्रदेशाध्यक्षांना मिळत असते. राष्ट्रवादीपक्ष अधिक मजबूत आपल्याला कारायचा असून प्रदेशाध्यक्षांचा दौऱ्यात संर्पूण जिल्हा राष्ट्रवादीशी उभा असल्याचे दाखवाचे आहे. रविंद्र भय्यासाहेब नाथाऊंशी लढून लढून थकले, पण आता नाथाभाऊ सोबत आल्याने रविंद्रभय्यांची ताकद वाढली आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्रवादी मजबूत करण्याचा प्रयत्न आपण करू असे मार्गदर्शन केले.