मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. सध्याची परिस्थिती पाहता बारावी परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांना तब्बल ८ हजार २५० रुपये इतके परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजित आहेत. परंतु, परीक्षेचा अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत भरण्याची मुभा शिक्षण मंडळानं दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर बारावीच्या परीक्षेवर घेण्यात येणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी जाहीर केलं होतं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत परीक्षेसंदर्भात एकमताने निर्णय घेण्यात आला.
दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करता येईल तसेच या संदर्भात केंद्र सरकारच्या सूचना याचा विचार केला जाईल आणि त्याचा निर्णय जाहीर केला जाहीर करण्यात येणार असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. तसेच काही तज्ज्ञांशी, महाराष्ट्र बोर्डासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.