पुणे (वृत्तसंस्था) पुणे रेल्वे स्टेशन वर आज्ञात व्यक्तीने ठेवला बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली आहे. (Explosive Found on Pune Railway Station) यानंतर तत्काळ प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर वाहतूक थांबवण्यात आली आहे. दोन्ही फलाटं रिकामी करण्यात आली आहेत. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक असून सर्व नागरिकांना परिसरापासून लांब पाठवण्यात आलं आहे.
रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर वाहतूक थांबवण्यात आली आहे. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झाले असून सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आला आहे. तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व ट्रेन थांबविण्यात आल्या आहेत. प्रवाशांना स्टेशन परिसरातून बाहेर काढण्यात आले आहे. पुणे स्टेशन वर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी करण्यात येत आहे.
संबंधित वस्तू रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या मैदानात नेण्यात आली आहे. बॉम्ब डिफ्युज करणाऱ्या पथकाने तत्काळ कार्यवाही करायला सुरुवात केली आहे. ही वस्तू नेमकी इथे कशी आली आणि कोणी आणली या संदर्भात तपास सुरु आहे. अद्याप या वस्तूची स्पष्टता होऊ शकलेली नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून रेल्वे स्टेशन परिसरात उपस्थित असलेल्या प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.