जळगाव प्रतिनिधी । समता नगरातील एका विहिरीत त्याचा परिसरात राहणाऱ्या सोनू राजू बनसोडे वय २७ या तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी समोर आली आहे. परिसरातील नागरीकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुलाचा मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती. असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
सोनू बनसोडे हा तरूण आपल्या आई व बहिण यांच्यासोबत समता नगरातील बौध्द वाडा येथे वास्तव्याला होता. मंगळवारी २३ जुलै रोजी रात्री ११ वाजता बाहेर जात असल्याचे सांगून सोनू हा घराबाहेर निघून गेला. रात्रीपर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या आईने शोधाशोध करण्यास सुरूवात केली. बुधवारी २४ जुलै रोजी सकाळी ७ वाजता समता नगरातील बौध्दवाडा येथील विहिरीत चपला तरंगतांना दिसून आले. त्यामुळे या ठिकाणी काहींनी गर्दी केली होती. या चपला सोनूच्याच आल्याचे त्याच्या आईने ओळखले. त्यानुसार पट्टीचे पोहणारा विहिरीत उडी घेऊन पहिल्याच प्रयत्नात सोनू याला बाहेर काढले. मुलाचा मृतदेह पाहताच त्याच्या आईने एकच आक्रोश केला. दरम्यान, परिसरातील तरूणांनी मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. सोनूने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराची मोठी गर्दी होती. याबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.