सातारा (वृत्तसंस्था) एका १४ वर्षीय मुलीतं अपहरण करुन तिच्यावर सातारा आणि कोल्हापूर येथे नेऊन अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा सुद्धा अल्पवयीनच आहे.
या संदर्भात अधिक असे की, एका १४ वर्षीय पीडित मुलीची आरोपीसोबत ओळख होती. याच अल्पवयीन आरोपीने मुलीला आमिष दाखवून ऑगस्ट महिन्यात आरोपीने पळवून नेले होते. मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. त्यांनतर पोलिसांनी आपला शोध सुरू केला. त्यानुसार दोन डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलगा आणि मुलगी हे कोल्हापूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोघांनाही कोल्हापुरातून साताऱ्यात आणले. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली. यावेळी पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, तिच्यावर सातारा आणि कोल्हापूर येथे नेऊन अत्याचार करण्यात आले.