नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढलं आहे. देवळा तालुक्यातील लोहणेर येथे एका युवकाला प्रेम प्रकरणातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर येथील हि घटना घटना आहे. तोहोणेर येथील दोघांचे प्रेम प्रकरण होते. मात्र मुलीच्या घरच्यांना हे पसंत नव्हते. त्यामुळे मुलीला स्थळे दाखविण्याचे काम चालू होते. मात्र सदर मुलामुळे हि स्थळे मोडली जात असल्याचे मुलीच्या घरच्यांचे म्हणणे होते. लग्न मोडल्याने मुलाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान या घटनेत युवक गंभीर भाजता असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. यानंतर संबंधित युवकाला देवळा येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. युवक ५५ टक्के भाजला असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनि सांगितले आहे.