नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देश सध्या कोरोना संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना मध्यप्रदेशच्या छिंदवाडामध्ये पतीने पत्नीला जिवंत जाळल्याचा प्रकार घडला आहे.
मासे पकडण्यासाठी सोबत जाण्यास पत्नीने नकार दिला म्हणून रागाच्या भरात पतीने तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मासेमारीला जाण्यावरून पती-पत्नीत वाद सुरू झाला. या वादामुळे संतापलेल्या पतीने टोकाचं पाऊल उचललं. पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा या भयंकर प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर तातडीने पत्नीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीररित्या भाजल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पत्नीने मासेमारीसाठी एकत्र जाण्यास नकार दिल्याने पतीने तिला मारहाण केली आणि नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं. छिंदवाडा येथील तमिया पोलीस ठाण्याच्या परिसरातील डेलखरी गावात ही भयंकर घटना आहे. नवा मोहल्ला येथे राहणारी बली कहार याची पत्नी गोमती बाई कहार सोबत रात्री खूप वाद झाला. मासेमारी वरून दोघांमध्ये वाद झाला. पतीने आपल्या पत्नीला एकत्र मासेमारीसाठी जाण्यास सांगितले असता तिने नकार दिला आणि त्यामुळे संतापलेल्या पतीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करण्यात येत आहे. घेतले असून पुढील चौकशी आणि तपास सुरू आहे.