नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एका व्यक्तीने आपल्या मेहुणीशी लग्न करण्यासाठी सुपारी देऊन पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर हत्येतील आरोपीने मृत्यूनंतर मृतदेहावर बलात्कार केल्याचे सांगितले. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी रामवीर आणि संदीप यांना नोएडा सेक्टर ९४ येथून अटक केली आहे.
अटक आरोपी रामवीरने पोलिसांना सांगितले की, तो तीन वर्षापासून ऑटो चालवतो आणि त्याचा मित्र संदीप कचोरी विकण्याचे काम करतो. रामवीरने पोलिसांना सांगितले की, १९ जानेवारी रोजी संदीपने त्याला त्याची पत्नी त्याच्या गावातील अजय उर्फ करणवर प्रेम करत होती. खूप समज देऊनही ती मानत नाही आणि गावी जाऊन त्याला भेटते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामवीरने संदीपला सांगितले की, माझ्या आणखी दोन मेहुण्याही आहेत. माझी पत्नी सोनीचा काटा काढला तर मी माझ्या धाकट्या मेहुणीशी लग्न करेन. वृत्तानुसार, राजवीरने सांगितले की, संदीपने सोनीचा काटा काढण्यासाठी सत्तर हजार रुपयांचे आमिष दाखवले. राजवीरने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्याला दारूचे व्यसन असल्याने संदीपने मला दिलेल्या पैशातून दारू विकत घेतली आणि संध्याकाळी दारू पिऊन तो त्याच्या खोलीत झोपला,
मृतदेहावरही केला बलात्कार
सकाळी संदीपने पुन्हा तिला पत्नीचा काटा काढण्याबाबत आठवण करून दिली आणि यावेळी ७० हजारांऐवजी दीड लाख रुपये देण्याचे बोलू लागला. रामवीरने सांगितले की, तो पायीच संदीपच्या खोलीत पोहोचला आणि सामान देण्याच्या बहाण्याने घरात घुसून पत्नीवर हल्ला केला. डोक्याला जबर मार लागल्याने संदीपच्या पत्नीचा मृत्यू झाला. यानंतर खुनाच्या आरोपीने मृतदेहावरही बलात्कार केला.