बीड (वृत्तसंस्था) जमीनीच्या वादातून बीडच्या रेजिस्ट्री कार्यालयात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. यात दोन जण जखमी झाले असून या घटनेनेमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या या कार्यालयामध्ये सकाळी अचानक गोळीबार झाला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जमीनीच्या वादातून हा गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये ४ राउंड फायर करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सतिश क्षीरसागर आणि फारुक सिद्दीकी अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. तर फायरिंग करणारा आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.