TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एक्सक्ल्युझिव्ह : टीईटी घोटाळ्यातील जळगाव जिल्ह्यातील ७१ शिक्षकांचे वेतन रोखले !

शालार्थ आयडीही रद्द करण्याची तयारी ; वसुली होण्याचीही शक्यता !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 21, 2022
in अमळनेर, गुन्हे, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जिल्हा प्रशासन, धरणगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, यावल, राजकीय, राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेत २०१९मध्ये गैरप्रकार झाला होता. जिल्ह्यात ६१४ जणांकडे टीईटी परीक्षेचे बोगस प्रमाणपत्र आहे. त्यामुळे संबंधितांवर आजीवन परीक्षा बंदीची कारवाई झाली आहे. तसेच बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षक म्हणून नोकरी मिळवलेल्यांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ७१ शिक्षकांचे ऑगस्टचे वेतन थांबवण्यासह भविष्यात शाळांनी संबंधित शिक्षकांचे नाव वेतन देयकात समाविष्ट करू नये, असे आदेश शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षकांनी दिले आहे.

या संदर्भात सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, भविष्य निर्वाह निधी पथक, महापालिकांचे प्रशासन अधिकारी, नगरपालिका, नगरपरिषद, कटक मंडळांचे मुख्याधिकारी यांना पत्र दिले आहे. टीईटी परीक्षा २०१९ मध्ये झालेल्या गैरप्रकारातील समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे आणि कारवाई निश्चित करण्यासंदर्भात परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडून प्राथमिक शिक्षण संचालनालयाला उमेदवारांची यादी देण्यात आली. तसेच या यादीतील परीक्षार्थी जिल्हा परिषद किंवा खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळेत कार्यरत असल्यास आणि या सेवेच्या अनुषंगाने त्यांना शालार्थ आयडी प्रदान केलेला असल्यास शिक्षण संचालकांनी त्यांच्या स्तरावरून पुढील आदेशापर्यंत शालार्थ आयडी गोठवण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेच्या यादीतील ७ हजार ८७४ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांचे आधार कार्ड आणि शालार्थ आयडीनुसार मॅपिंग करण्यात आले असता अपात्र उमेदवारांपैकी ७१ उमेदवार जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळ, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण सेवक किंवा सहशिक्षक कार्यरत आहेत आणि वेतन अनुदान घेत असल्याचे निदर्शनास आले.

READ ALSO

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

या पार्श्वभूमीवर संबंधित ७१ उमेदवारांचे शालार्थ आयडी गोठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शालार्थ आयडी गोठवण्यात आलेल्या उमेदवारांची नावे ऑगस्टच्या वेतन देयकामध्ये समाविष्ट असण्याची शक्यता लक्षात घेऊन सदरचे वेतन देयक रद्द करावे. संबंधितांचे नाव वेतन देयकातून वगळून ऑगस्टचे वेतन देयक तयार करून अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान देण्यात यावे. शालार्थ आयडी गोठवण्यात आलेल्या उमेदवारांचे ऑगस्टपासूनचे वेतन अनुदान ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी संबंधित उमेदवारांना वेतन अनुदान किंवा फरक देयक दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

शाळांकडून माहिती मागवली पण प्रतिसाद नाही
बोगस टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांपैकी २०१९ मध्ये टीईटी प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या शिक्षकांची माहिती मागवली आहे. पण अद्याप जिल्ह्यातील अनेक शाळांकडून माहिती सादर करण्यात आलेली नाही. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर बोगस प्रमाणपत्रांची पडताळणी होऊ शकणार आहे.

विजय वाघमारे (९२८४०५८६८३)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

February 26, 2026
चाळीसगाव

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

February 26, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
जळगाव

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
जळगाव

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

February 25, 2026
Next Post

जळगावहून लोणारला जाणारा पंचवीस लाखांचा गुटखा जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मविप्र’ वाद : बंद घर उघडल्यावर पोलीसही चक्रावले !

January 9, 2022

एरंडोल येथे निशुल्क सात दिवसीय योग साधना शिबिरचे उद्घाटन

February 21, 2022

पुढच्या चौकात सोडतो म्हणत वृद्धाला कारमध्ये बसवत गंडवले !

August 3, 2025

गुगलने बॅन केले ‘हे’ ३ अँप्स ; फोनमधून करा लगेचच डिलीट, Login-ID होताय चोरी !

October 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group