जळगाव (प्रतिनिधी) मी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकावण्यासाठी शिवसैनिकांनी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. माझ्या आमदारकी व मंत्री पदासाठी जनतेचे प्रेम व कार्यकर्त्यांची खंबीर साथ हीच माझी खरी श्रीमंती आहे. प्रत्येक बुथाप्रमुखांनी “माझा बूथ – माझी जबाबदारी” मिशन मोडवर राबवून आगामी निवडणुकांमध्ये भगवा फडकावण्यासाठी शिवसैनिक, पदाधिकारी, सरपंचानी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. प्रत्येक गणनिहाय बैठका घेणार असून त्या मुळे त्या त्या पदाधिकाऱ्यांचे ऑडिट होणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव येथे शिवसेनेच्या तालुकास्तरीय मेळाव्यात बोलत होते.
यावेळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व ग्रा. पं. सदस्य, शेतकी संघाचे संचालक, घोषित झालेल्या धरणगाव तालुक्यातील आत्मा कमेटीतील अध्यक्ष व सदस्यांचा तसेच आदर्श शिक्षक भैया मराठे सर आणि राज्यस्तरीय जीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले भानुदास विसावे यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, गजानन पाटील, डी. ओ. पाटील, सचिन पवार, मुकुंद नन्नवरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, खान्देशची ओळख असून त्याचा आम्हाला अभिमान आहे. मतभेद विसरून एकजुटीने पक्ष संघटन बांधणीसाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले.
शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, प्रत्येक शाखा प्रमुख व पदाधिकाऱ्यांनी पक्षाला पोषक असेल असे काम करून प्रत्येक कार्यकर्ता हा गुलाबराव पाटील व्हावा. ही बैठक पक्षाची नव्हे तर माझ्या कुटुंबाची आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघाची शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून असलेली ओळख कायम ठेवण्यासाठी खासदारकी , आमदारकी आमदारकी सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा फडकण्यासाठी संघटना बांधणी करावी. यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना संघटना बांधणेसाठीचे कानमंत्र ही दिले.
यांचा झाला शिवसेनेत प्रवेश
धरणगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनवणे यांच्यासह पारधी समाजाचे प्रवीण पारधी, आनंद पारधी, प्रदीप पारधी,सुरेश पारधी, अमृत पारधी, सुनिल जाधव, अरुण जाधव, बबलू पारधी, गणेश पारधी, यांच्यासह अनेकांनी शिवसेनेचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून पक्षात स्वागत केले. बैठकीचे प्रास्ताविक विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी केले. सूत्रसंचालन युवासेनेचे भैया मराठे सर यांनी केले. आभार शहर प्रमुख विलास महाजन यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
शिवसेनेच्या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, विधासभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, मार्केटचे गजानन नाना पाटील, मागासवर्गीय सेनेचे युवासेनेचे तालुका प्रमुख दिपक भदाने, जिल्हा प्रमुख मुकुंद नन्नवरे, शहर प्रमुख विलास महाजन, तालुका संघटक रवि चव्हाण सर, महिला आघाडीच्या प्रिया इंगळे, भारती पवार, जेष्ठ शिवसैनिक देविदास भदाणे, दामूअण्णा पाटील, भगवान महाजन, सचिन पवार माजी सभापती प्रेमराज पाटील, सचिन पवार, अनिल पाटील , मोतीआप्पा पाटील, यांच्या सह तालुक्यातील शिवसेनेचे, युवासेनेचे व महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते