जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा व पोलिस प्रशासनाने हद्दपार केलेल्या दोघां अट्टल गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिस पथकाने गणपती विसर्जनाच्या दिवशी ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील दोन अट्टल गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले होते. हद्दपारीचे आदेश झुगारुन सर्रास वावरणारा विशाल राजु अहिरे (रा.आदित्य चौक रामेश्वर कॉलनी) याची गुप्त माहिती मिळाल्यावर निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, सुधीर सावळे, इम्रान सैय्यद,सचिन पाटील, साईनाथ मुंडे, गोविंदा पाटील, हेमंत कळसकर यांच्या पथकाने रामेश्वर कॉलनीतून अहिरे याला ताब्यात घेतले. यानंतर लगेच ललित उर्फ सोनु गणेश चौधरी (रा. इश्वर कॉलनी जळगाव) याची माहिती मिळाल्याने पथकाने त्यास ईश्वर कॉलनी परिसरातून ताब्यात घेत. दोघांना पोलिस ठाण्यात आणून दोघांविरुद्ध भा.द.वि.188 व 269 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.