बोदवड (प्रतिनिधी) येथील न. ह.रांका शाळेत ८ व्या इयत्तेत शिकणाऱ्या अभिषेक सुभाष पाटील (रा-चिखली) या विद्यार्थ्याने सापडलेला महागडा मोबाईल मालकास परत केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अभिषेक पाटील हा विद्यार्थी गावातील मयूर बाभुळकर याचे सोबत मोटारसायकलने गावाहून बोदवड येथे शिकवणीसाठी येतांना पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास थांबले. त्या वेळी पंपाबाहेरील रस्त्यावर अभिषेक यास एक मोबाईल सापडला. त्याने तो लगेच मयूर यास दादा मला कोणाचा तरी मोबाईल सापडला असे सांगितले व ते लागलीच पोलीस ठाण्यात आले.
तेथून मोबाईल वरील नंबरवर संपर्क करून मोबाईल मालक दिपक कोळी (रा-एणगाव) यांचा पत्ता मिळवला आणि त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून मोबाईल त्यांच्या स्वाधीन केला. आपला चोवीस हजार रुपयांचा मोबाईल परत मिळाल्याने कोळी यांनी त्या मुलाचे कौतुक करत दोनशे रुपये बक्षीस देण्याची इच्छा व्यक्त केली. हा मुलगा हे बक्षीस घेण्यासाठी नकार देत होता पण पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांच्या आग्रहानंतर त्याने ते बक्षीस स्वीकारले. यावेळी अभिषेक पाटील व मयूर बाभुळकर यांचे ठाणे अंमलदार सुधाकर शेजोळे, हे. कॉ ,सुभाष गुरचळ, वसंत निकम, कॉ .दिपक पाटील, शशिकांत महाले यांनी सुद्धा सत्कार करून कौतुक केले.













