भुसावळ (प्रतिनिधी) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे नेत्र तज्ञ डॉ.सौ.रेणुका पाटील आणि डॉ.नितु पाटील यांनी दि.१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या काळात मतदार जनजागृती अभियान यशस्वीपणे राबविले.
मतदान करण्यासाठी मतदारांना १ नोव्हेंबरपासून सवलत देण्यास सुरवात झाली होती. तसेच मतदान झाल्यावर देखील पुढील ३० नोव्हेंबर पर्यंत नेत्रतपासणी फी सवलत दिली गेली होती. मतदारांचा उत्साह पाहता आणि अभियानाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता,तसेच नेत्ररुग्णांच्या विशेष मागणी वरून सदर अभियानास मुदतवाढ दिली गेली आहे.असे डॉ.नितु पाटील यांनी कळविले आहे.आता हे अभियान दि.२१ डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.मतदारांनी मतदान केल्यावर पुरावा म्हणून केवळ बोटावरील शाई दाखवल्यास सदर सवलतीचा फायदा घेता येणार आहे.
डॉ.पाटील दाम्पत्य यांनी वासुदेव नेत्रालय २०१४ मध्ये सुरु झाल्यापासून प्रत्येक लोकसभा,विधानसभा,जिल्हा परीषद,पंचायत समिती,नगरपालिका,ग्रामपंचायत आदी.विविध निवडणुकीत सदर उपक्रम राबवत असून आपले सामाजिक भान जोपासत आहे.मागील लोकसभा निवडणुकीमध्ये राबवलेलेया उपक्रमाबद्दल भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून वासुदेव नेत्रालाला विशेष गौरवपत्र प्राप्त झाले होते.तसेच अलीकडे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून देखील गौरव पत्र मिळाले आहे.