अमळनेर (प्रतिनिधी) येथील भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी ७ जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असतो. याच अनुषंगाने दि. ७ जुलै रोजी आरोग्य शिबीर, वृक्षारोपण तसेच विविध लोकहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
प्रामुख्याने नेत्र तपासणी व मानसोपचार शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अमळनेर येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. कौस्तुभ दिलीप वानखेडे (ठाकूर) M.B. B. S, M.S. Ophth.व मानसोपचार तज्ञ डॉ.श्रध्दा कौस्तुभ वानखेडे (ठाकूर) M.B. B. S, Dip.C.M.H.आदी तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत. सदर शिबीर दि. ७ जुलै बुधवार रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल.आदित्य कॉर्नर, डी. आर. कन्याशाळेजवळ, धुळे रोड, अमळनेर येथे संपन्न होणार आहे. शिबिराची जय्यत तयारी सुरू असून जास्तीतजास्त रुग्णांना या शिबिराचा लाभ कसा मिळेल हा प्रयत्न आयोजकांचा आहे. डॉ. कौस्तुभ वानखेडे व डॉ. सौ श्रद्धा वानखेडे यांचा अमळनेर तालुकाच नव्हे तर जिल्हा परिसरात नावलौकिक असून असे तज्ञ डॉक्टर आमदार अनिल पाटलांच्या वाढदिवसानिमित्त शिबिरात मोफत सेवा देणार असल्याने या शिबिराबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन अमळनेर शहर व तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.
वाढदिवसाची वृक्षारोपणाची देणार अनोखी भेट
अमळनेर मतदारसंघात लोकप्रिय ठरलेले आमदार अनिल पाटील यांना वृक्षांच्या रुपाने १०० वर्षे जगवण्याचा उपक्रम यंदाच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक राजु फापोरेकर आणि कल्पनेश्वर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आला असून त्या अनुषंगाने दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ढेकू रोडवर हरिओम नगर येथे खुल्या भूखंडात आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी पर्यावरण प्रेमींनी आवर्जून उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजक राजू फाफोरेकर व कल्पनेश्वर प्रतिष्ठान च्यावतीने करण्यात आले आहे.
दि. ७ जुलै रोजी आमदार अनिल भाईदास पाटील जी एस हायस्कूल मध्ये स्वतः रक्तदान करून कार्यकर्ते देखील रक्तदान करणार आहेत. जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान चळवळीत सहभागी व्हावे असे, आवाहनही आमदार अनिल पाटील यांनी केले आहे. दरम्यान, याच पद्धतीने विविध सामाजिक व लोकहिताचे कार्यकम दि. ७ जुलै रोजी शहर व ग्रामिण भागात विविध मंडळ, कार्यकर्ते, हितचिंतक व ग्रामस्थांच्या वतीने पार पडणार आहेत.