TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे जळगावात आयोजन !

विविध क्रीडा प्रकारात एक हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2023
in क्रीडा, जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 2 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान जळगाव येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महावितरणच्या सर्व 16 परिमंडलांतील 1 हजार 83 अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. यात 353 महिला तर 730 पुरुष खेळाडूंचा समावेश आहे.

महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 2022-23 या वर्षाकरिता या स्पर्धेचे यजमानपद जळगाव परिमंडलाकडे आहे. स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (2 फेब्रुवारी) सकाळी साडेनऊ वाजता जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय ‍सिंघल यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, संचालक (संचालन) संजय ताकसांडे, संचालक (वित्त) रवींद्र सावंत, संचालक (प्रकल्प/मानव संसाधन) प्रसाद रेशमे, प्र. संचालक (वाणिज्य) तथा कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, कार्यकारी संचालक (संचालन/मानव संसाधन) अरविंद भादीकर, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) प्रमोद शेवाळे, कार्यकारी संचालक (‍वित्त व लेखा) स्वाती व्यवहारे, प्रादे‍शिक संचालक (नागपूर) सुहास रंगारी, प्रादे‍शिक संचालक (पुणे) अंकुश नाळे उपस्थित राहणार आहेत.

READ ALSO

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण रविवारी (5 फेब्रुवारी) दुपारी 4 वाजता एकलव्य क्रीडा संकुलावरच कोकण प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक (संचालन) संजय ताकसांडे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, संचालक (वित्त) रवींद्र सावंत, संचालक (प्रकल्प/मानव संसाधन) प्रसाद रेशमे, प्र. संचालक (वाणिज्य) तथा कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, कार्यकारी संचालक (संचालन/मानव संसाधन) अरविंद भादीकर, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) प्रमोद शेवाळे, कार्यकारी संचालक (‍वित्त व लेखा) स्वाती व्यवहारे, प्रादे‍शिक संचालक (नागपूर) सुहास रंगारी, प्रादे‍शिक संचालक (पुणे) अंकुश नाळे, स्पर्धेचे मुख्य समन्व्यक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेत खो-खो, ॲथलेटिक्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिक्वाईट, कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, बुद्धिबळ आणि ब्रिज या खेळांचा समावेश आहे. वैयक्तिक, सांघिक आणि सर्वसाधारण या तिन्ही प्रकारात विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. जळगाव ‍ परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचे गठण करण्यात आले असून स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि आयोजन समितीचे सचिव तथा जळगाव परिमंडलाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर परिश्रम घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
Next Post

Union Budget 2023 : अजित पवारांची अर्थसंकल्पावर कडक शब्दात प्रतिक्रिया म्हणाले...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भीषण अपघात : बसची आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक ; १७ जण ठार !

January 6, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ४ कोरोनाबाधित, ६ झाले बरे !

July 25, 2021

धरणगावात शिंदे गटातर्फे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन !

November 17, 2022

जळगावात ‘ईद पाडवा’चा अनोखा सोहळा; सामाजिक एकता आणि देशभक्तीचा जागर

April 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group