TheClearNews.Com
Wednesday, March 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोदींनंतर फडणवीसच सक्षम नेतृत्व : फडणवीसांना पुण्यातून लोकसभेचे तिकीट द्या, ब्राह्मण महासंघाची भाजप नेतृत्वाकडे मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) : भाजपच्या देशाच्या कार्यकारणीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची वर्णी लागल्यानंतर पुण्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी करणारे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी लिहले आहे.

पत्रात नेमकं काय लिहिलं आहे –
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस यांना आपण स्थान दिलंत त्याबद्दल अभिनंदन. देवेंद्र फडणवीस कुशल राजकारणी असून, मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी हे सिद्ध केलं आहे. ते भाजपाचं भविष्य आहेत. नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपाला सक्षम नेतृत्व देणाऱ्यांमध्ये जी काही दोन-तीन नावे आहेत, त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एक महिन्यापूर्वी त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडण्यात आल्याने धक्का नक्कीच बसला होता. पण आता घेतलेल्या निर्णयाने थोडासा दिलासा मिळाला आहे. या निवडीसोबत राष्ट्रीय कार्यामध्ये फडणवीसांच्या कामाला सुरुवात झाली आहे असं मानलं जाऊ शकतं”.

READ ALSO

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

“पुण्यातील ब्राह्मण महासंघ २००९ मध्ये काँग्रेसच्या सुरेश कलमाडींसोबत उभा होता. २०१४ मध्ये अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये गिरीष बापट यांना पाठिंबा दिला होता. त्याचे परिणाम तुमच्यासमोर आहेत. त्यामुळे फडणवीसांसारख्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी ही सुरक्षित जागा आहे. फडणवीसांना फक्त अर्ज भरायचा आहे, जिंकवण्याचं काम ब्राह्मण महासंघ करणार,” असा शब्दही त्यांनी दिला आहे.

“अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांच्यानंतर नेतृत्वाची ही परंपरा देवेंद्र फडणवीस कायम राखतील असा विश्वास आम्हाला वाटतो. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. तरीही राष्ट्रहितासाठी आमचा आग्रह आहे,” असं त्यांनी पत्रात सांगितलं आहे.

गोविंद कुलकर्णी पुढे म्हणाले की, पुणे हा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा गड असून 2006 मध्ये आम्ही काँग्रेसचे सुरेश कलमाडी, 2014 मध्ये भाजपचे अनिल शिराेळे, 2019 मध्ये गिरीष बापट यांच्यासाेबत उभे राहिलो. त्याचा परिणाम समोर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पुणे हा सुरक्षित मतदारसंघ आहे. फडणवीस यांनी या मतदारसंघातून नामांकन भरले, तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ त्यांना विजयी करण्यासाठी काम करेल. अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेला नाही. परंतु राष्ट्र हिताच्या दृष्टीने आमचा हा आग्रह आहे. कुलकर्णी पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे हुशार राजकीय व्यक्तिमत्व असून त्यांनी यापूर्वी सलग पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. राज्यातील जनतेचे कल्याण व्हावे याकरीता त्यांनी अथक प्रयत्न केले असून भाजपचे ते भविष्य आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
Next Post

खळबळजनक : दाम्पत्याला जंगलात नेत लुटले, सहा आरोपी अटकेत ; मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव नाईट ग्रुपतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना !

April 14, 2023

लग्नाचे अमिष दाखवत तरुणीवर अत्याचार !

May 17, 2025

रानडुक्करांची शिकार करणारे दोघे अटकेत; ३ दिवसांची पोलीस कोठडी

November 3, 2020

पाचोरा येथील तरुणीचा डेंग्यूने मृत्यू !

October 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group