मुंबई (वृत्तसंस्था) महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्येच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ. जयश्री थोरात यांच्या नावे फेसबुक युजर्सकडून पैशांची मागणी केली जात आहे. याप्रकरणी सायबर क्राईमची तक्रार अहमदनगरमधील संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
नामांकीत व्यक्तींची सोशल मीडियातील बनावट अंकाऊंट तयार करुन पैशांची मागणी करण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. काँग्रेसनेते आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरातांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. जयश्री थोरातचं फेसबुकचं बनावट अकाऊंट बनवण्यात आलं आहे. जयश्री थोरातांच्या फेसबुक अकाऊंटवरून एका अज्ञात व्यक्ती पैशांची मागणी करतोय, याप्रकरणी सायबर क्राईमची तक्रार संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांची मुलगी जयश्री थोरात यांचं बनावट अकाऊंट तयार केलं आहे. यासाठी बाळासाहेब थोरात आणि जयश्री थोरात यांच्या फेसबुक पेजवरील फोटोंचा गैरवापर केल्याची बाब समोर आली आहे. या बनावट अकाऊंटद्वारे पैशाची मागणी केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे जयश्री थोरात यांच्या मित्र परिवाराकडून गुगल पे आणि फोन पे द्वारे पैशांची मागणी केली जात आहे. या प्रकरणाबाबत अहमदनगरमधील संगमनेर पोलीस ठाण्यात सिद्धार्थ बाळासाहेब थोरात यांनी तक्रार केली आहे.
कोण आहेत डॉ. जयश्री थोरात?
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यां टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी रुग्णांची सेवा केली आहे. जयश्री थोरात यांचा डिसेंबर २०२० मध्ये डॉ. हसमुख यांच्यासोबत साखरपुडा झाला. लवकरच त्या विवाहबंधनात अडकतील.
एकविरा फाऊंडेशनची स्थापना
“एकविरा फाउंडेशन”च्या माध्यमातून संगमनेरात सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य तपासणी, समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम डॉ. जयश्री थोरात यांनी राबवले आहेत. महिला-युवतींसाठी एकविरा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.