मुंबई (वृत्तसंस्था) प्रेसिडेंट पोलिस मेडल विजेता आणि पोलिसचे माजी असिस्टंट कमिशनर यांनी रिपब्लिकन टीव्ही वृत्तवाहिनेचे संपादक अर्णब गोस्वामी विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे.
तिकडे, फेक TRP केसमध्ये कांदिवली पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आला. याच प्रकरणाच्या तापासासाठी आज मुंबई क्राइम ब्रांचच्या ऑफिसमध्ये रिपब्लिक टीव्हीचा CFO एस सुंदरम, डिस्ट्रीब्यूशन हेड जी. सिंह आणि सीनियर एडिटर निरंजन नारायणस्वामीला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. अर्णबच्या विरोधातील मानहानी केसमध्ये आज सुनावणी होऊ शकते. पिटीशनरने आरोप लावला आहे की, ‘ज्यावेळी एका प्रकरणावर कायदेशीररित्या तपास सुरू आहे, तेव्हा बचाव पक्ष नंबर-1 (गोस्वामी) ला ही सूट दिली जाऊ शकत नाही की, ते आपल्याच केसविषयी आपल्याच चॅनलवर चर्चासत्र आयोजित करुन मुंबई पोलिसांना बदनाम करतील.’
प्रेसिडेंट पोलिस मेडल विजेता आणि पोलिसचे माजी असिस्टंट कमिशनर शेख यांनी आरोप लावला की, गोस्वामी वादग्रस्त डिबेट्स आणि स्टोरी टेलीकास्ट करत आहेत. यामुळे तपासावर परिणाम होऊ शकतो. अर्णबने दोन प्रसिद्ध चॅनल्सचा मालक असल्याच्या नात्यााने आपल्या सीमा पार केल्या आहेत आणि आपला अजेंडा सुरू केला आहे.