पुणे (वृत्तसंस्था) एकनाथराव खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्याच सोबत ओबीसी समाजाचे नेते म्हणून ही खडसे प्रसिद्ध होते. तब्बल चाळीस वर्षानंतर भाजपाला सोचडचिठ्ठी देत खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, पुण्यातील प्रशांत संकपाळ हे प्रसिद्ध गोल्डमॅन हे देखील आज खडसेंसोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
एकीकडे एकनाथ खडसे यांच्या जाण्याने भाजपाला कितपत फटका बसणार आहे हे आगामी काळात कळेल तूर्तास खडसे सोबत राष्ट्रवादीत कोण प्रवेश करणार याची चर्चा आहे. एकनाथ खडसे सोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्याच सोबत काही माजी आमदारही भाजपाला राम राम करत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधणार आहेत. एकनाथ खडसे सोबत कोणीही जाणार नाही असा दावा भाजप नेते करत आहेत पण दहा-बारा आमदार माझ्या संपर्कात आहेत असं खडसेंनी सांगितले आहे.
सध्यातरी एकनाथ खडसे सोबत आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार्यांमध्ये एका गोल्डमॅन ची प्रचंड चर्चा आहे. खडकवासल्याचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या नंतर पुन्हा एकदा पुण्यातील एका गोल्डमॅनची चर्चा सोशल मीडिया सुरू आहे. या गोल्डमॅनचे नाव आहे प्रशांत संकपाळ , कोट्यावधीचा सोनं अंगावर परिधान करून आजूबाजूला पाच-सहा बाउन्सर्सचा असा गराडा असलेले प्रशांत संकपाळ पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश करणार आहे.
एकनाथ खडसे आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्याचवेळी प्रशांत संकपाळ राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. गेल्या २ ते३ दिवसांपासून राष्ट्रवादी नेत्याच्या संपर्कात आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. पक्षात प्रवेश केल्यानंतर जबाबदारी काय द्यायची हे नेतृत्व ठरवतील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे याने त्यांच्या संपर्कात असल्याने आज शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याचं संकपाळ यांनी सांगितले आहे.
प्रशांत संकपाळ हे प्रसिद्ध गोल्डमॅन असून व्यवसायाने ते बिल्डर आहेत सोने घालण्याची हाऊस इसकी की तब्बल पाच किलो सोनं त्यांच्या अंगावर आहे. पायातील बूट आणि पासून ते कपडेपर्यंत सगळं सोनं आहे. मी माझ्या मेहनतीच्या पैशातून सोनं खरेदी केल्याच प्रशांत संकपाळ सांगतात.