धरणगाव (प्रतिनिधी) स्व. राजेंद्र महाजन यांच्या स्मृतीनिमित्त शिंदे गटाकडून धरणगाव येथे महाआरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन, शेतकरी सेना तालुका प्रमुख विनायक महाजन यांनी केले आहे.
धरणगाव तालुक्यातील सर्व नागरिक हे शेतकरी असल्याने त्यांचा दैनंदिन जीवनातील शरिरातील विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी त्यांचा शारिरीक आरोग्याची काळजी घ्यावी ,म्हणून तालुक्यातील सर्व ज्ञशेतकरी समाज बांधव यांनी येत्या 16 तारीख वार सोमवार रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत सुरू रहाणार असणाऱ्या आरोग्य शिबिराचा लाभ घाव, असे आवाहन शेतकरी सेना तालुका प्रमुख विनायक महाजन यांनी केले आहे.
या आरोग्य शिबिरात डॉ.दीपक पाटील,डॉ. आनंद निकुंभे,डॉ. गोविंद मंत्री,डॉ. तुषार चौधरी, डॉ. पंकज शहा, डॉ.शौनक पाटील, डॉ.सचिन पाटील, डॉ.हिना चौधरी, डॉ.विशाल जैन, डॉ.वैजयंती उपाध्ये, डॉ.अक्षय भावे हे अनुभवी डॉक्टर तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. तर यावेळी हृदयरोग, कर्करोग,त्वचारोग, मेंदू रोग, अवयव प्रत्यारोपण, स्त्रीरोग,मानसिक आरोग्य, ग्रंथींचे विकार, जेनेटिक विकार, मूत्रविकार, नेत्रतपासणी, अस्थिव्यंग, मधुमेह, श्वसनाचे विकार, कान, नाक, घसा, प्लॅस्टिक सर्जरी, दंतरोग, लठ्ठपणा, हार्निया, अॅपेंडिक्स, आतड्याचे विकार, अस्थिव्यंगोपचार, बालहृदयविकार अशा विविध आजारांची तपासणी विनामूल्य करण्यात येणार आहे. तसेच यावेळी रक्तदान करणाऱ्या दात्यांना शर्ट देण्यात येणार आहे. झुमकराम सार्वजनिक वाचनालय मेन रोड कोटबाजार येथे सकाळी १० ते ४ वाजेच्या दरम्यान होणार आहे.