TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकरी आंदोलन : झी, टाइम्स नाऊचे वार्तांकन चुकीचे !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २६ जानेवारी २०२१ रोजी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीतल्या आंदोलकाकडून लाल किल्ल्यावरचा तिरंगा झेंडा काढल्याचे चुकीचे वृत्तांकन करून हे आंदोलन खलिस्तानी असल्याचा आरोप करणाऱ्या झी वृत्तवाहिनीवर द न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड ऑथॉरिटी (एनबीडीएसए) या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच एनबीडीएसएने टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीचे संपादक व वृत्तनिवेदिकेवरही नाराजी व्यक्त केली आहे.

 

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

‘या’ व्हीडिओमधून झी न्यूजने शेतकरी आंदोलन खलिस्तान चळवळीशी जोडले

 

झी न्यूजने २६ जानेवारीच्या लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलक घुसले होते. यातील काहींनी देशाचा तिरंगा झेंडा काढल्याचे वृत्त प्रसारित केले होते. या अफवेवर विश्वास ठेवून झी न्यूजने तीन व्हीडिओ प्रसारित केले होते. या व्हीडिओमधून झी न्यूजने शेतकरी आंदोलन खलिस्तान चळवळीशी जोडले होते, हे व्हीडिओ नैतिक संहितांचे उल्लंघन असून या वृत्तवाहिनीने हे व्हीडिओ मागे घेतले पाहिजेत, असे एनबीडीएसएने या वृत्तवाहिनीला सांगितले आहे. एनबीडीएसएने सर्व वृत्तवाहिन्यांकडून वृत्तांमध्ये तथ्य, पुरावे व निःष्पक्षपणे पत्रकारिता दिसली पाहिजे, अशी अपेक्षा केली आहे. आपल्या वृत्तांकनात चूक दिसली तरी ती चूक लगेच दुरुस्त करून प्रेक्षकांना सांगितली पाहिजे. झीच्या वृत्तांकनात तसे दिसून आले नाही, अशीही टिप्पण्णी एनबीडीएसएने केली आहे.

 

टाइम्स नाऊने ८ महत्त्वाच्या नैतिक संहितांचे उल्लंघन केले

 

तसेच एनबीडीएसएने टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीचे संपादक व वृत्तनिवेदिका राहुल शिवशंकर व पद्मजा जोशी यांनी दिल्ली दंगलीवर केलेल्या कार्यक्रमावरही नाराजी व्यक्त केली आहे. दिल्ली दंगलीवर सादर करण्यात आलेले या दोन पत्रकारांचे कार्यक्रम अभिनिवेशयुक्त व निःष्पक्ष नव्हते, या कार्यक्रमांनी पत्रकारितेतील ८ महत्त्वाच्या नैतिक संहितांचे सरळ सरळ उल्लंघन केले. वृत्तांमध्ये भडकपणा, अतिरंजितपणा आणणे, समाजात भय व अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न या वृत्तवाहिनीकडून होता, असे एनबीडीएसएचे म्हणणे आहे.

 

कार्यकर्ते इंद्रजित घोरपडे यांनी एनबीडीएसएकडे तक्रार

 

झी वृत्तवाहिनीच्या १९, २०, २६ जानेवारीच्या शेतकरी आंदोलनाच्या वृत्तांकनाविरोधात कार्यकर्ते इंद्रजित घोरपडे यांनी एनबीडीएसएकडे तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी झी वृत्तवाहिनीने दिल्लीत ट्रॅक्टर परेडमधील फुलांनी सजवलेले ट्रॅक्टर दाखवले होते. प्रत्यक्षात हा व्हीडिओ जर्मनीतल्या एका चॅरिटी शोचा होता. असे खोटे व्हीडिओ दाखवून समाजात तेढ तयार करत असल्याचा आरोप घोरपडे यांचा होता. ट्रॅक्टर परेडचे वृत्तांकन करताना झी न्यूजने दिलेले मथळेही भडक व दिशाभूल करणारे होते, असे घोरपडे यांचे आरोप होते.

 

झी वृत्तवाहिनीने सर्व आरोप फेटाळले

 

दरम्यान द क्विंटने दिलेल्या वृत्तानुसार झी वृत्तवाहिनीने त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले आहे. आम्ही शेतकरी आंदोलनाला कलंकित केले नाही. जे व्हीडिओ प्रसारित केले त्याची सत्यता तपासलेली नाही, असाही खुलासा आम्ही केला होता. लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरवल्याचे वृत्तांकन थेट घटनास्थळावरून असल्याने नजरचुकीने झाले व त्या संदर्भातला यू ट्यूबवरचा व्हीडिओ आम्ही उतरवला आहे. घोरपडेंनी केलेले आरोप दोन धर्मांत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असाही आरोप झी न्यूजने केला आहे. घोरपडेंनी त्यावर उत्तर देताना या वृत्तवाहिनीने चुकीच्या व खोट्या बातम्या देताना प्रेक्षकांची माफीही मागण्याची तसदी घेतली नाही, असा आरोप केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

जुन्नर पतसंस्थेवर दरोडा ; दरोडेखोरांनी व्यवस्थापकाला झाडल्या गोळ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. मंगेश चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन ; कन्नड घाटात पोलिस करत होते पैशांची मागणी !

November 25, 2021

नांदुरा तालुक्यातील विकास कामांचा अनुशेष भरून काढू : श्रीराम पाटील !

May 5, 2024

अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने चिरडले ; काका-पुतण्यासह तिघे जागीच ठार !

December 31, 2023

राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाण्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद : ना. पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group