टोकयो (वृत्तसंस्था) भारताच्या नीरज चोप्राने इतिहास घडवला आहे. भालाफेक या क्रीडाप्रकारात भारताला पहिलंवहिलं सुवर्ण पदक मिळालं आहे. सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, त्यानंतर लष्करामध्ये नोकरी आणि मग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक!. पण नीरजचा हा प्रवास सोपा नव्हता. अथक परिश्रमानंतर त्याने ध्येय साध्य करत देशाचं नाव अभिमानाने उंचावलं. जाणून घ्या भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राविषयी महत्वपूर्ण माहिती !
२०११ मध्ये पानिपत येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण आर त्याचे काका त्याला घेऊन गेले. तेव्हा तो १३ वर्षाचा होता आणि त्याचे वजन जवळपास ७७ किलो इतके होते. तेथे त्यांन भालेफेक पटुंनकडून काही टिप्स घेतल्या आणि काही महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर त्यानं जिल्हा स्पर्धेत कास्य पदक जिंकले. खेळासाठी त्यांन कुटुंबियांना भारतीय क्रीडा प्राधिकरण आत राहण्याची परवानगी मिळाली यासाठी तयार केले. तेव्हा तो फक्त १४ वर्षाचा होता. अथक मेहनत व कुटुंबीयांच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नाव गाजवले. २०१८ साली पार पडलेल्या आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याचा उपक्रम नीरज चोप्रानं केला. त्यानं ८८.०६ मीटर भालाफेक करताना स्वतःच्याच नावावरील राष्ट्रीय विक्रम मोडला. २०१८ च्या आशियाई स्पर्धेत त्यांन ८८.०६ मीटर लांब भालाफेक केली होती. त्या स्पर्धेत तो भारताचा ध्वज धारक होता.
त्यांना २०१६ मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, त्यानंतर २०१६ मध्ये त्यांन २० वर्षाखालील अजिंक्यपद स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकताना तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. २०१७ च्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचेही जेतेपद त्याच्या नावावर राहिले. तो सध्या जर्मनीच्या क्लास बार्तोनिएतझ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. याआधी त्यानं गॅरी कॅल्व्हर्ट, वेर्नेर डॅनिएल्स आणि उवे होहना यांच्याकडून प्रशिक्षण घेतले होते.
२४ डिसेंबर १९९७ मध्ये त्याचा जन्म झाला, तो भारतीय सैन्यात junior commissioned officer (JCO) या पदावर कार्यरत आहे. हरियाणा येथील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील त्याचा जन्म. त्यांन चंदीगड येथील DAV महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आहे. ३१ मार्च २०२० मध्ये त्यांन कोरोना विरुद्धच्या लढ्यात पंतप्रधान सहाय्यता निधीत २ लाखांची मदत केली होती.