TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशा जैनची आघाडी

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतून उद्याचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू घडणार, डॉ.भावना जैन यांचा विश्वास

vijay waghmare by vijay waghmare
August 7, 2025
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि.७ प्रतिनिधी – जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरु असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जोरदार चुरस निर्माण झाली आहे. स्पर्धेत शुक्रवारी शेवटची फेरी खेळली जाणार असून विजेतेपदासाठी खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत सुरु आहेत. मुलांमध्ये दिल्लीचा अरिहत कपिल याने आठ गुण घेत आघाडी घेतली आहे. त्याला ७.५ गुणांसह महाराष्ट्राचा आर्यन मेहता, मनी सरबातो (पश्चिम बंगाल), वोनिश्चिक मंडल (पश्चिम बंगाल) लढत देत आहेत. मुलींमध्ये महाराष्ट्राची क्रिशा जैन हिने आघाडी घेतली आहे. तिच्यासमोर वंशिका (दिल्ली) आणि जानकी (केरळ) यांनी आव्हान उभे केले आहे.

मुलांच्या लढती अशा रंगल्या

READ ALSO

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

जैन हिल्स येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ३९२ मुले आणि १७७ मुली सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यात पहिल्या दिवसांपासून जोरदार लढती सुरु आहेत. स्पर्धेतील नववी फेरी रंगतदार झाली. आघाडीवर असलेल्या खेळाडूंचे सामने अनिर्णित राहिले. पश्चिम बंगालमधील मनी सरबातो आणि अरहित कपिल यांचा सामना बरोबरीत सुटला. यामुळे कपिल याचे आठ गुण झाले तर मनी सरबातो ७.५ गुणांवर आहे. महाराष्ट्राचा अद्वित अग्रवाल आणि पश्चिम बंगालचा अवरित चव्हाण यांच्यातील नवव्या फेरीतील सामनाही बरोबरीत राहिला. कर्नाटकमधील अभिनव आनंद आणि महाराष्ट्रातील अविरत चौहान यांचा लढतीचाही निकाल लागला नाही. तो सामनाही बरोबरीत राहिला. परंतु महाराष्ट्राचा आर्यन मेहता याने तेलंगणातील नदोष शामल याचा पराभव करत स्पर्धेत चुरस कायम ठेवली. पॉडिचेरी येथील राहुल रामकृष्ण आणि गुजरातमधील विहान यांची लढतसुद्धा बरोबरीत राहिली. पश्चिम बंगालमधील वोनिश्चिक मंडल याने धुव्र गुप्ता याचा पराभव केला.

मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशासमोर आव्हान
मुलांप्रमाणे मुलींच्या गटात नवव्या फेरीअखेर चांगलीच चुरस आहे. महाराष्ट्रातील क्रिशा जैन हिने ८ गुण घेत विजेतेपदाकडे एक पाऊल पुढे टाकले आहे. क्रिशा हिने नवव्या फेरीत केरळमधील दिवी बिजेस हिला पराभूत केले. समीहा (तेलंगणा) आणि वंशिका रावल (दिल्ली) यांच्या लढतीत वंशिका विजयी झाली. तेलंगणातील अलाहिमा हिचा केरळमधील जानकी एस डी हिने अटीतटीच्या लढतीत पराभव केला. महाराष्ट्रातील क्रिशा ही ८ गुणांसह आघाडीवर आहे तर वंशिका आणि जानकी ७.५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कौशल्य दाखवण्याचे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ-डॉ.भावना जैन

गुरुवारी सकाळच्या सत्राचे उद्घाटन कांताई नेत्रालयाच्या प्रमुख डॉ.भावना जैन यांनी बुद्धिबळाच्या पटावरील चाल खेळत केले. यावेळी खेळाडूंसोबत संवाद साधताना त्यांनी सांगितले की, देशभरातून आलेले सर्व खेळाडू जैन हिल्स येथे सुरु असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुमच्यातील काही जण उद्याचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू होणार आहेत. देशातील नामांकीत बुद्धिबळपटू तयार होणार आहे. त्यासाठी तुमच्यात असलेले कौशल्य दाखवण्याचे हे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ तुम्हाला मिळाले आहे. त्याचा पुरेपुर लाभ घ्या, असे आवाहन डॉ.भावना जैन यांनी केले. उद्घाटन प्रसंगी जळगाव बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, मुख्य पंच देवाशीष बरुआ उपस्थित होते. स्पर्धेसाठी अरविंद देशापांडे, प्रविण ठाकरे, रवींद्र धर्माधिकारी, संजय पाटील परिश्रम घेत आहेत.

फोटो ओळ –
(_DSC4955-) जैन हिल्स येथे ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चाल खेळत उद्घाटन करताना डॉ.भावना जैन, सोबत नंदलाल गादिया, देवाशीष बरुआ.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMaharashtra's Krisha Jain leads in girls' category

Related Posts

गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑगस्ट 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

February 22, 2026

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना विमा कवच, सानुग्र्हाय अनुदान देण्यात येते का? ; डॉ. नितु पाटील यांची पालिकेला विचारणा !

February 24, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली

July 31, 2021

जळगाव जिल्ह्यातील ३९२ शाळा तंबाखू मुक्त घोषित

May 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group