TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभूतपूर्व घटना…अटकेच्या भीतीने संशयिताने घरपोच परत केले ठेवीदारांचे १ कोटी १२ लाख !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 7, 2021
in गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) देशाच्या कोणत्याच आर्थिक घोटाळयात आजतागायत घडली नव्हती. अशी एक अभूतपूर्व घटना बीएचआर घोटाळ्यात घडली आहे. आज चक्क एका संशयित आरोपीने अटकेच्या भीतीपोटी थोडथोडके नव्हे, तर चक्क १ कोटी १२ लाख रुपये ६४ ठेवीदारांना घरी जाऊन परत केले आहेत. यातील बहुतांश ठेवीदारांनी पुणे आर्थिक शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके मॅडमांचे आभार मानले आहेत. तसेच नवटके मॅडमांच्या कारवाईच्या भीतीमुळेच हे शक्य झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. दरम्यान, या घोटाळ्यातील संशयितांनी अटकेपूर्वी ठेवीदारांचे पैसे परत केल्यास कदाचित त्यांना दिलासा मिळू शकतो. तर दुसरीकडे अटकेतील आरोपी देखील आम्ही पैसे भरण्यास तयार असल्याचे कोर्टात सांगत आहेत. थोडक्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईच्या भीतीमुळे ठेवीदारांचे पैसे परत मिळायला आता जोरात सुरुवात झाली आहे.

 

READ ALSO

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

देशात आजपर्यंत अनेक घोटाळे झाले आहेत. बँक, पतसंस्था बुडाल्या की, ठेवीदारांना आपल्या कष्टाचा पैसा मिळवण्यासाठी न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेक वर्ष कोर्टात केसेस चालतात. अगदी निकाल लागल्यानंतरही पैसा मिळत नाही. त्यामुळे अनेकांचा उपचाराअभावी मृत्यू होतो. अनेकांचे शैक्षणिक नुकसान होते. तर अनेक मुलींचे लग्नही होऊ शकलेले नाहीत. थोडक्यात एकदा बुडालेला पैसा परत मिळणे कठीणच असते. परंतू बीएचआर घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या भाग्यश्री नवटके मॅडमांनी मागील वर्षापासून अनेक बड्या लोकांना बेड्या घातल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी तर एकाच दिवशी राज्यातील विविध शहरातून ११ लोकांना अटक केली होती. तेव्हापासूनच या अटकसत्रामुळे संशयित आरोपींच्या मनात धडकी भरलेली आहे. याचाच परिपाक म्हणून आज बीएचआर घोटाळ्यात  पैसे परत करण्यासारखी अभूतपूर्व घटना घडली.

 

निमगाव-केतकी येथील ठेवीदारांमध्ये आनंदाची लहर

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव-केतकी येथील संशयित आरोपी प्रमोद किसन कापसे याने ६४ ठेवीदारांचे ५० लाख रुपये चक्क घरी जाऊन परत दिले आहेत. विशेष म्हणजे यातील ९० टक्के ठेवीदार हे शेतकरी आहेत. कापसे याने ४० टक्के रक्कम देऊन ठेवीदारांकडून १०० टक्के पैसे मिळाल्याचे प्रतिज्ञापत्र करून घेतले होते. परंतू पुणे आर्थिक गुन्हे शाखेने निमगाव-केतकी येथील ठेवीदारांचे जबाब घेतले होते. त्यानुसार त्यांना फक्त ४० टक्के रक्कम मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी कापसेला अटक करण्याची तयारी सुरु केली होती. परंतू अटकेच्या भीतीनेच कापसे याने मागील दोन दिवसात ६४ ठेवीदारांन घरी जाऊन उर्वरित ६० टक्के रक्कम देखील परत केली आहे. कापसेने आतापर्यंत तब्बल १ कोटी १२ लाखाची रक्कम परत केली आहे. तसेच पुढील काही दिवसात तो आणखी काही ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करणार असल्याचे कळते.

 

दुसरीकडे अटकेतील आरोपी देखील आम्ही पैसे भरण्यास तयार असल्याचे कोर्टात सांगत आहेत. बीएचआर घोटाळा प्रकरणात कर्जदार तथा संशयित आरोपी अंबादास मानकापे व आसिफ तेली या दोघांनी कर्जाची रक्कम भरण्याची तयारी दाखवली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी नुकताच पुण्याच्या विशेष न्यायालयात अर्ज सादर केले होते. यापूर्वी भागवत भंगाळे यांनी देखील अशाच पद्धतीने पैसे भरायची तयारी दर्शवली आहे.

 

…म्हणूनच अभूतपूर्व घटना ! 

आर्थिक घोटाळ्यांमध्ये गुन्हे दाखल होतात. आरोपींना अटक केली जाते. अनेकांना शिक्षा होते. परंतू ठेवीदारांचे पैसे परत मिळत नाही. ‘सहकारातून समृद्धीकडे’, विना सहकार नाही उद्धार….सहकारी संस्थांचे हे ब्रीद वाक्य खरं तर लोकांसाठी आहे. परंतू गेल्या काही वर्षांत संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे अनेक पतसंस्था आर्थिक नुकसानीत गेल्याची काही उदाहरणे पुढे आली. त्यामध्ये ठेवीदारांचे अधिक नुकसान झाले आहे आणि सरकारला फारशी मदत करता आलेली नाही, हे देखील एक सत्य आहे. म्हणूनच पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईच्या भीतीपोटी एकाच वेळी १ कोटी १२ लाखाची रक्कम ठेवीदारांना परत मिळाल्यामुळे ही घटना अभूतपूर्व अशीच मानली जात आहे. त्यामुळेच उपायुक्त भाग्यश्री नवटके आणि त्यांचे तपासधिकारी सुचेता खोकले, पोलीस निरीक्षक संदीप भोसलेंसह आर्थिक गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाचे ठेवीदार आभार मानत आहेत.

 

विजय वाघमारे (99284058683)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
Next Post

कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात यावल पोलीस अपयशी, कारवाई करण्यासाठी उपोषण करू : जलीलदादा पटेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लोकशाहीत भूक भागवून भीती दूर झाली पाहिजे : प्रा.अरुणभाई गुजराथी

February 2, 2022

धरणगावात संत सावता माळी युवक संघातर्फे सामाजिक कार्यक्रम संपन्न

September 15, 2020

घरबसल्या १० मिनिटांत फ्रीमध्ये बनवा Pan Card ; जाणून घ्या.. प्रक्रिया

January 11, 2022

अंबानींच्या घराबाहेर नाट्यरुपांतर ; सचिन वाझेंना सदरा घालून चालायला लावलं

March 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group